Maratha Kranti Morcha Complaint: लालबागचा राजा मंडळावर गुन्हा दाखल करा, मराठा क्रांती मोर्चाची पोलिसात तक्रार

Maratha Kranti Morcha Complaint: लालबागचा राजा मंडळावर गुन्हा दाखल करा, मराठा क्रांती मोर्चाची पोलिसात तक्रार
Maratha Kranti Morcha Complaint: छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान केल्याप्रकरणी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर गुन्हा दाखल कण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त यांच्याकडे मुंबई मराठा क्रांती मोर्चाने तक्रार ईमेलद्वारे पाठवली आहे. त्याचप्रमाणे काळाचौकी पोलिसांना (Maratha Kranti Morcha) देखील लेखी तक्रार देण्यात आली आहे. (Insult of Shivaji Maharaj Rajmudra) त्यामुळे गणेशोत्सवापूर्वीच लालबागचा राजा (King of Lalbagh) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Raja Mandal of Lalbagh)
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा लालबाग राजाच्या पायावर दाखवण्याचा जो प्रयत्न मंडळाने केला, त्यांचा ह्या पाठचा नेमका हेतू काय होता? हे आम्हा शिव अनुयायीस कळत नाही. परंतु त्यांनी शिवराजमुद्रा लालबागच्या राजाच्या पायी छापून संपूर्ण शिव अनुयायांचा अवमान केला आहे. लालबागचा राजा (गणपती बाप्पा) देव जरी असले तरी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे देव देव्हाऱ्यात आहेत. ही राजमुद्रा पायावर असणे मनाला पटत नाही. आपल्या स्वराज्याची राजमुद्रा मस्तकी लावावी पण पायावर पहायला मिळत आहे, याची खंत वाटत आहे. कृपया आपण संबधित गोष्टीची खात्री करून लालबागचा राजा मित्र मंडळावर गुन्हा दाखल करावा असा अर्ज ईमेलद्वारे मुंबई पोलिस आयुक्तांना केला आहे.
शिवरायांमुळे देव देव्हाऱ्यात: मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी अमोल भैया जाधवराव यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, आपण पाहिलं असेल काल लालबागच्या राजाच्या पायाचे छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रांनी टाकलेला एक फोटो व्हायरल झाला खरं. तर आम्ही शिवप्रेमी म्हणूनआमच्या भावना दुखावल्या असतील असा आम्ही स्पष्टपणे इथे नमूद करतो. लालबागचा राजा लाखो लोकांचे, लाखो भाविकांचे जरी श्रद्धास्थान असले, गणपती बाप्पा जरी आपला देव असेल तरी देव तो केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देव्हाऱ्यात बसला आहे, हे आपण विसरता कामा नये.
मंडळाने चूक सुधारावी: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची अवहेलना होणं हे माझ्यासारख्या शिवप्रेमीला कदापी सहन होणार नाही. म्हणून आम्ही प्रथमतः त्या गोष्टीचा निषेध केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मंडळाला आणि इतर लोकांना त्यांनी जी चूक केली आहे ती सुधारण्याचे आवाहन केले. त्याचकरता आम्ही मुंबई पोलिसांना ईमेल द्वारे तक्रार देखील केली आहे. जेणेकरून मंडळाने ही केलेली गोष्ट दुरुस्त करावी. जर दुरुस्त करत नसतील तर आम्हाला नाईलाज आहे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना आवाहन करावे लागेल. कारण त्यांनी जे केलं ते अत्यंत चुकीचे आहे.
काय म्हटले आहे पत्रात? व्यक्तींना धर्माने नाकारलं अशा व्यक्तींचं कर्तृत्व एवढं महान झालं की त्या त्या धर्मालात्या व्यक्तीच्या समोर झुकावं लागलं. त्यातलाच एक उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना होणं आणि धर्माशी तुलना करून धर्मा-धर्मामध्ये आणि जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणं आहे. हे जर जाणीवपूर्वक करत असेल तर त्याला आम्ही कदापि सहन करणार नाही. लालबागचा राजा मंडळाला एवढीच विनंती करू इच्छितो की, बाप्पा हा तुमचा आहे आमचा आहे सर्वांचा आहे. लोकांची श्रद्धा आहे म्हणून इथे लोक येतात. पण जर आपण अशा महाराजांसंदर्भातली एखादी गोष्ट घेऊन जर लोकांची भावना दुखावणार असाल तर ते अत्यंत चुकीचे आहे. आपण केलेली चूक सुधारावी अशी विनंती अमोल भैया जाधवराव यांनी केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
- विषय संपलेला आहे: त्याचप्रमाणे या संदर्भात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी विषय संपलेला आहे. सध्या उद्याच्या तयारीत व्यस्त असल्याची प्रतिक्रिया ई टीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
हेही वाचा:
