Mumbai Ram Navami Clashes : मालाड परिसरात रामनवमी शोभायात्रेदरम्यान हाणामारी; २० जणांना अटक, ३०० हून अधिक जणांविरूद्ध गुन्हा

author img

By

Published : Mar 31, 2023, 1:49 PM IST

Updated : Mar 31, 2023, 2:42 PM IST

Mumbai Ram Navami Clashes

मालाड परिसरात रामनवमी शोभायात्रेदरम्यान दोन गटात हाणामारी झाली होती. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी २० जणांना अटक केली आहे. ३०० हून अधिक अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया देताना डीसीपी अजय बन्सल

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी रामनवमी निमित्ताने निघालेल्या शोभायात्रेदरम्यान दंगल झाल्याचे प्रकार पाहावयास मिळाले. मालवणी परिसरात शोभायात्रेत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी तीनशेहून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील मालवणी पोलिस ठाण्यात आयपीसी कलम ३२४, ३५३ आणि इतर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. इतर आरोपींचा शोध घेत आहेत.



वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न : डीसीपी अजय बन्सल म्हणाले की, रामनवमीच्या मिरवणुकीत काही अज्ञात लोकांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. काही काळ परिस्थिती तणावपूर्ण होती, पण आता सर्व काही ठीक आहे. मालवणी पोलिसांनी २० जणांना ताब्यात घेतले आहे. आयपीसीच्या कलम १४३, १४७, १४९, ३२४, ३५३, ३३२ अंतर्गत एफआयआर नोंदवला गेला आहे. मालाड पश्चिम उपनगरातील मालवणी येथे गुरुवारी रात्री रामनवमी निमित्ताने मिरवणूक काढली जात होती. काही लोकांनी मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यास हरकत घेतली, या कारणामुळे हाणामारी झाली.




परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली : दोन गटांमध्ये झालेल्या या हाणामारीत दगडफेक करण्यात आली होती. त्या कारणामुळे परिसरात दहशत पसरली, असे ते म्हणाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलिस दल मागवण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिस कर्मचाऱ्यांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला. वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि काही स्थानिक राजकारणी तातडीने त्या घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले, असे ते म्हणाले. परिसरात मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले.




अटक करण्याची प्रक्रिया सुरू : गुरुवारी रात्री मालाड (पश्चिम) उपनगरातील मालवणी येथे रामनवमीची मिरवणूक काढली जात होती. त्यावेळी काही लोकांनी मोठ्या आवाजात संगीत वाजविण्यास आक्षेप घेतला. त्यामुळे हाणामारी झाली. मालवणी पोलिसांनी आतापर्यंत दंगलीच्या आरोपाखाली 20 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अशीच दंगल घडली. त्यात एका व्यक्तीचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा : Jalna Crime News: धक्कादायक! जालन्यात रामनवमीच्या मिरवणुकीत वादातून तरुणाचा खून

Last Updated :Mar 31, 2023, 2:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.