शासकीय कर्मचाऱ्यांना शासनाचा दणका, जेवणाच्या सुट्टीवर गंडांतर

author img

By

Published : Jun 7, 2019, 9:48 PM IST

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकरीता दुपारी १ ते २ या वेळेत जेवणासाठी जास्तीत जास्त अर्ध्या तासाची वेळ देण्यात आली आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी राज्य शासनाने ४ जूनला हा शासन आदेश जारी केला आहे.

मुंबई- शासकीय कर्मचाऱ्यांना जेवणासाठी दुपारी एक ते दोनची वेळ दिलेली आहे. मात्र आता या दुपारच्या सुट्टीवर गंडातर आले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी अर्ध्या तासातच जेवण उरकावे, असा शासन आदेशच निर्गमित करण्यात आला आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी राज्य शासनाने ४ जूनला हा शासन आदेश जारी केला आहे.

जेवणाची सुट्टी तासभर असली तरी अर्ध्यातासात जेवण उरकावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सूचनांचे पालन नियमित होण्यासाठी खबरदारी घ्यावी, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांना सध्या सर्वत्र दुपारी एक ते दोन जेवणाची सुट्टी दिली जात आहे. मात्र, २१ ऑगस्ट १९८८ च्या शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालयीन वेळेत दुपारच्या भोजनासाठी अर्धा तासाची सुट्टी आहे. हे निदर्शनाला आणण्यात आले आहे. अनेक ठिकाणी नागरीक सरकारी कार्यालयात आपल्या तक्रारी घेऊन आल्यास त्यांना अनेकदा अधिकारी आणि कर्मचारी दुपारच्या वेळेत उपलब्ध होत नाहीत. तसेच अनेकदा जेवणाची सुट्टीच्या नावाखाली कार्यलयात अनुपस्थित असल्याचे शासनाच्या निदर्शनाला आले आहे. त्यामुळे हा संबंधित आदेश जारी करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागातल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकरीता दुपारी १ ते २ या वेळेत जेवणासाठी जास्तीत जास्त अर्ध्या तासाची वेळ देण्यात आली आहे. त्याचबररोबर एकाच कार्यलयातील अधिकारी आणि कर्मचारी एकाच वेळी जेवणासाठी जाणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही कार्यालय प्रमुखांना या आदेशात देण्यात आल्या आहेत.

Intro:शासकीय कर्मचाऱ्यांना शासनाचा दणका, जेवणाच्या सुट्टीवर गंडांतर

मुंबई 7

शासकीय कर्मचाऱ्यांना दुपारी एक ते दोन ची वेळ दिली असली तरी दुपारच्या सुट्टीत अर्ध्या तासात जेवण उरकावे असा शासन आदेशच निर्गमित केल्याने जेवणाच्या सुट्टीवर गंडांतर आले आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी शासनाने 4 जूनला शासन आदेश जारी केला आहे.
जेवणाची सुट्टी तासभर असली तरी अर्ध्यातासात जेवण उरकावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.तसेच कर्मचाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सूचनांचे पालन नियमित होण्यासाठी खबरदारी घ्यावी असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांना सध्या सर्वत्र दुपारी एक ते दोन जेवणाची सुट्टी दिली जात आहे. मात्र २१ ऑगस्ट १९८८ च्या शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालयीन वेळेत दुपारच्या भोजनासाठी अर्धा तासाची सुट्टी आहे हे निदर्शनाला आणण्यात आले आहे. अनेक ठिकाणी नागरीक सरकारी कार्यालयात आपल्या तक्रारी घेऊन आल्यास त्यांना अनेकदा अधिकारी आणि कर्मचारी दुपारच्या वेळेत उपलब्ध होत नाहीत. तसेच अनेकदा जेवणाची सुट्टीच्या नावाखाली कार्यलयात अनुपस्तिथीत असल्याचे शासनाच्या निदर्शनाला आले असल्याने हा संबंधित आदेश जारी करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागातल्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकरीता दुपारी १ ते २ या वेळेत जेवणासाठी जास्तीत जास्त अर्ध्या तासाची वेळ देण्यात आली आहे. त्याचबररोबर एकाच कार्यलयातील अधिकारी आणि कर्मचारी एकाच वेळी जेवणासाठी जाणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना ही कार्यालय प्रमुखांना या आदेशात देण्यात आल्या आहेतBody:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.