Congress Suspend To Ashish Deshmukh : बंडखोर नेते आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी; देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती भेट

author img

By

Published : May 24, 2023, 2:33 PM IST

Congress Suspend To Ashish Deshmukh

काँग्रेसचे बंडखोर नेते आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केवल्यामुळे आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

नागपूर : काँग्रेसचे बंडखोर नेते आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याने पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या हकालपट्टीची घोषणा केली आहे. आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.

सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने 05 मार्च 2023 रोजी आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पक्षविरोधी वर्तनाबद्दल व जाहीर वक्तव्याबद्दल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्वानुसार आशिष देशमुख यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे यावेळी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पृथ्वीराज चव्हाणांनी केली घोषणा : पक्षविरोधी वक्तव्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने कारवाई केली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून आशिष देशमुख यांची सहा वर्षांच्या कालावधीसाठी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पृत्वीराज चव्हाण यांनी केली आहे. या आदेशाद्वारे पक्षविरोधी कारवायांकरीता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरुन पुढील सहा वर्षाकरिता तात्काळ निष्कासित करण्यात आल्याची माहिती पृत्वीराज चव्हाण यांनी आज दिली.

देवेंद्र फडणवीसांची घेतली होती भेट : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. यावेळी आशिष देशमुख यांना भाजप आगामी निवडणुकीत उमेदवारी देणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजी होती. त्या नाराजीनंतर आता आशिष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. Sanjay Raut On Pm : राष्ट्रपतींना नव्या संसद भवनच्या उद्धाटनाला न बोलवणे हा देशाचा अपमान, विरोधी पक्ष करणार बहिष्कार - संजय राऊत
  2. Arvind Kejriwal Mumbai Visit : अरविंद केजरीवाल, भगवंत मान उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
  3. PM Modi In Australia : पंतप्रधान मोदींचा सिडनीमध्ये गार्ड ऑफ ऑनरने सत्कार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.