वाडिया रुग्णालयात नवजात बाळाची अदलाबदली; डॉक्टर, नर्सेसवर भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाडिया रुग्णालयात नवजात बाळाची अदलाबदली; डॉक्टर, नर्सेसवर भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Wadia Hospital : वाडिया रुग्णालयात मुलं अदलाबदली केल्याप्रकरणी लेबर वॉर्डमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेस विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात (Bhoiwada Police Station) भारतीय दंड संविधान कलम ३३६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोराटे यांनी दिली आहे.
मुंबई Wadia Hospital : प्रभादेवी रोड येथे राहणाऱ्या सुनीता गंजेजी यांची जून महिन्यात परळ येथील वाडिया रुग्णालयात प्रसूती झाली. ७ जूनला गंजेजी दाम्पत्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. कारण त्यांच्या आयुष्यात नव्या बाळानं जन्म घेतला होता. ७ जूनला रात्री ९ वाजता सुनीता गंजेजी यांची प्रसूती झाल्यानंतर त्या रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत बेशुद्ध अवस्थेत होत्या. दरम्यान, वाडिया रुग्णालय येथील लेबर वॉर्डमध्ये काम करणाऱ्या संबंधित डॉक्टर, नर्सेस यांनी सुनीता यांनी जन्मास घातलेल्या मुळ मुलास, त्याचा लेबर वॉर्डमध्ये जन्म झाल्यानंतर तत्काळ न दाखवून निष्काळजिपणा केला. असा आरोप डॉक्टर आणि नर्सेसवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळं तक्रारदार यांचे मुळ मुलं बदली होण्यास कारणीभूत ठरले आहे. तक्रारदार सुनीता यांनी कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टर व नर्सेस यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.
डीएनए तपासणी केली : ७ जूनला तक्रार आल्यानंतर भोईवाडा पोलिसांना डीएनए तपासणी केली. त्याचा अहवाल आला असून तो मॅच होत नाही. मात्र, ही डीएनए तपासणी खासगी लॅबमधून केल्यानं पोलीस तपासात तो अहवाल ग्राह्य धरला जाणार नाही. म्हणून भोईवाडा पोलिसांनी सरकारी लॅबमधून डीएनए तपासणी करण्यासाठी रितसर गुन्हा दाखल केला आहे. सुनीता गंजेजी यांना मुलगा झाला असून डॉक्टर आणि नर्सेस यांनी बदली करून मुलगी आणून दिली असल्याचा आरोप तक्रारदार सुनीता गंजेजी यांनी केला आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : वाडिया रुग्णालयात मुलं बदली केल्याप्रकरणी लेबर वॉर्डमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसने कर्तव्यावर निष्काळजीपणा केल्यानं त्यांच्या विरोधात भारतीय दंड संविधान कलम ३३६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता भोईवाडा पोलीस सरकारी लॅबमधून वाडिया रुग्णालयातील मुलीचा आणि तक्रारदार महिला यांची डीएनए तपासणी पुन्हा करणार असल्याची माहिती, पोलिसांनी दिली आहे. तसंच आरोपी डॉक्टर आणि नर्सेस यांचा जबाब देखील भोईवाडा पोलीस नोंदवणार (Bhoiwada Police) आहेत.
हेही वाचा -
