Drone Attack : राज्यात ड्रोनच्या माध्यमातून हल्ला होण्याचा धोका; प्रमुख शहरात अलर्ट

author img

By

Published : Jan 12, 2022, 5:31 PM IST

drone attack

आता मुंबई आणि महाराष्ट्रावरही ड्रोनच्या माध्यमातून हल्ला होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. ( Drone Attack Possibility Maharashtra ) केंद्रीय तपास यंत्रणेच्या मार्फत ( Central Invesigation Agencies ) सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरे अलर्टवर आहेत. ( Alert in Maharashtra )

मुंबई - आतापर्यंत महाराष्ट्राच्या बाहेरच ड्रोन हल्ल्याची भीती व्यक्त केली जात असताना आता मुंबई आणि महाराष्ट्रावरही ड्रोनच्या माध्यमातून हल्ला होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. ( Drone Attack Possibility Maharashtra ) केंद्रीय तपास यंत्रणेच्या मार्फत ( Central Invesigation Agencies ) सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरे अलर्टवर आहेत. ( Alert in Maharashtra ) नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना तपास यंत्रणांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.

सुरक्षा यंत्रणा सज्ज -

जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोन हल्ल्यांची भीती नेहमीच व्यक्त केली जाते. मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्यांबाबत कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याजोगी परिस्थिती समोर आली नव्हती. मात्र, आता याबाबतचे संकेत संभाषण चौकशी यंत्रणांना समोर आल्याने पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातच असे काही घडले तर इथे अँटी-ड्रोन यंत्रणाही नाही. महाराष्ट्र सायबर पोलिसांनीही ही बाब मान्य केली आहे. त्यामुळे आता मुंबईला हादरवून टाकणारं डार्कनेटचं कारस्थान पुन्हा एकदा समोर आलं आहे.

हेही वाचा - High Court Relief to Girish Mahajan : भाजपचे नेते गिरीश महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा कायम

दहशतवादी सहानुभूती बाळगणारे ड्रोन हल्ले, रासायनिक हल्ले आणि सायबर हल्ल्यांबद्दल डार्कनेटवर बोलताना दिसतात. पृष्ठभागाच्या जाळ्याच्या तुलनेत डार्कनेट 99 टक्के आहे. टोर ब्राउझर डार्क नेटमध्ये वापरला जातो. तो सहज पकडता येत नाही. कारण त्यात अनेक प्रॉक्सी बाऊन्सिंगचा वापर केला जातो. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरांवर ड्रोन हल्ल्यांबाबत अनेकदा अलर्ट दिले जातात, असे माहिती महाराष्ट्र सायबर आयजी यशस्वी यादव यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.