Maharashtra Political Crisis : बंडखोर आमदारांना धमकावू नका, परिणाम भोगावे लागतील: नारायण राणे

author img

By

Published : Jun 24, 2022, 10:16 AM IST

Updated : Jun 24, 2022, 10:27 AM IST

Narayan Rane

बंडखोर आमदारांना धमकावू नका (Dont intimidate rebel MLAs), अन्यथा परिणाम भोगावे लागतील (you will have to suffer the consequences) असा दमच केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी ट्विटच्या माध्यमातुन दिला आहे. काल शरद पवार यांनी शिवसेनेतून गेलेल्या बंडखोर आमदारांनी घेतलेला निर्णय पक्षांतर बंदी ( Sharad pawar on anti defection law ) कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा शरद पवार यांनी दिला होता.

मुंबई: शरद पवार यांनी बंडखोर आमदारांना पक्षांतर बंदीचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा शरद पवार यांनी दिला होता. त्याला प्रत्युत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विधानसभेतील बंडखोर आमदारांचे कोणतेही नुकसान झाले तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे म्हणले आहे. ट्विट करत राणेंनी म्हणले आहे की, 'माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.

  • माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, 'सभागृहात येऊन दाखवा', ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.

    — Narayan Rane (@MeNarayanRane) June 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय म्हणाले होते पवार: शिवसेनेतून गेलेल्या बंडखोर आमदारांनी घेतलेला निर्णय पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्याशिवाय त्यांच्या मतदारसंघात देखील त्याची प्रतिक्रिया उमटेल, त्यामुळेच आपल्या मतदारसंघातील लोकांना काहीतरी सांगावे, यासाठी निधी मिळत नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत. तसेच ज्यावेळी छगन भुजबळ हे शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तेव्हा त्यांच्यासोबत बारा ते सोळा लोक आले होते. जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा एक सोडून इतर सर्वांचा पराभव झाला. हा पूर्वीचा अनुभव आहे, असे म्हणत शरद पवारांनी शिंदेसोबत गेलेल्या आमदारांना दम दिला होता.

हेही वाचा : Sharad Pawar warning to Rebel : परिणाम भोगावे लागतील.. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पवारांचा दम!

Last Updated :Jun 24, 2022, 10:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.