Breaking : गुलाब चक्रिवादळ आंध्र-ओडिशाच्या किनारपट्टीजवळ

author img

By

Published : Sep 26, 2021, 9:09 AM IST

Updated : Sep 26, 2021, 9:19 PM IST

Breaking

21:18 September 26

गुलाब चक्रिवादळ आंध्र-ओडिशाच्या किनारपट्टीजवळ

रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास गुलाब चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या उत्तर तर ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीजवळ पोहोचले. हे वादळ कलिंगपटनमपासून 20 किलोमीटरवर असल्यचे हवामान विभागाने म्हटले आहे. वादळामुळे किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यांसह पाऊस सुरू आहे. वादळादरम्यान आंध्र प्रदेशात दोन मच्छिमारांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

12:47 September 26

खादी उत्पादने खेरदी करू आणि बापूंची जयंती उत्साहात साजरी करू - पंतप्रधान मोदी

चला 2 ऑक्टोबर रोजी खादी उत्पादने खरेदी करू आणि बापूंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करू, असे मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

12:43 September 26

नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रकाचा समोरासमोर अपघात, एक गंभीर

यवतमाळवरून औरंगाबादकडे म्हशी घेऊन जाणारा आयशर (MH 20 ct 8889) व औरंगाबादकडून मालेगावकडे येत असलेल्या ट्रक (Od 23 d 2947) यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात 4 म्हशी आणि म्हशी घेऊन जाणारा आयशर चालक शेख अलीम शेख हसन (वय 38 वर्षे) जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. त्याचा सध्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

12:10 September 26

नवी दिल्ली -

तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात दाखल

ढोल-ताशा, लेझीम पथक, दाक्षिणात्या संस्कृती आणि इतर सांस्कृतीक कार्यक्रमाच्या नादगजरात मोदींचे दिल्लीत स्वागत

11:41 September 26

औरंगाबाद -

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगावकर यांचा राजीनामा

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे औरंगाबादसह वैजापूर दौऱ्यावर आहेत

या दौऱ्याच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगावकर यांचा राजीनामा

या राजीनाम्याने औरंगाबादसह वैजपुरच्या राजकीय वर्तुळात खळबळ

11:02 September 26

मुंबई -

चेंबूर परिसरात एका 20 वर्षीय महिलेला लोखंडी रॉड दाखवून धमकी

धमकी देऊन महिलेवर बलात्कार

महिलेच्या तक्रारीनंतर चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक

आरोपींना आज न्यायालयात केलं जाणार हजर

मुंबई पोलिसांची माहिती

10:58 September 26

नवी दिल्ली -

'लेफ्ट विंग एक्स्टेरिझम' या विषयावरील केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची बैठक सुरू

विज्ञान भवन येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित

नक्षलवाद प्रवाहित राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला हजर

नक्षलवादावर होणार चर्चा

10:56 September 26

मुंबई -

भायखळा कारागृहात गेल्या 10 दिवसात 39 कैद्यांसह 6 मुलांना कोरोना

सर्व कोविड पॉझिटिव्ह लोकांना आयसोलेशन सेंटरमध्ये हलवण्यात आले

120 कैदी आणि तुरुंगातील कर्मचाऱ्यांची कोविड तपासणी करण्यात आली

एक गर्भवती महिला कैदी सावधगिरीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल

मुंबई महानगरपालिकेची माहिती

10:08 September 26

कोल्हापूर -

कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्ह्याच्या महापुरास कारणीभूत असणाऱ्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय रद्द करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे मागणी

कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यांवरील पुलाचा भराव कमी करून कमानी बांधकाम करण्याचीही मागणी

स्वःता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेट्टी यांनी केली मागणी

यावेळी मुख्यमंत्री बोम्मई यांनी महापुराच्या समस्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून पुलांचे भरावे कमी करून कमानी उभारणी करून पाणी प्रवाहित केले जाईल, असे आश्वासन दिले.

09:32 September 26

नवी दिल्ली -

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दिल्लीत दाखल

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत होणार नक्षलवादावर चर्चा

नक्षलप्रभावित जिल्हे असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसबोत गृहमंत्री चर्चा करणार

राज्यांमधील नक्षलवादाचा बिमोड आणि नक्षल प्रभावित जिल्ह्यांच्या विकासावर होणार चर्चा

यानंतर ठाकरे-शहांची खासगीत बैठक होण्याची शक्यता

राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या

09:29 September 26

नवी दिल्ली -

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता करणार मन की बात

आज मोदी अमेरिकेच्या ऐतिहासिक दौऱ्यावरून मायदेशी परणार

मायदेशी परतताच करणार मन की बात

आजची 81 मनकी बात

08:57 September 26

Breaking Update

चाळीसगाव तालुक्यात मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस

पाटणादेवी तसेच कन्नड घाट परिसरात पावसाचा जोर 

तितूर नदीला पुन्हा आला पूर

चाळीसगाव शहरात सखल भागात साचले पुराचे पाणी

यावर्षी महिनाभरातच सलग चौथ्यांदा पूर

Last Updated :Sep 26, 2021, 9:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.