Big Breaking : चार ऑक्टोबरपासून सुरू होणार राज्यातील शाळा

author img

By

Published : Sep 24, 2021, 7:39 AM IST

Updated : Sep 24, 2021, 9:16 PM IST

Breaking

21:14 September 24

दुरूस्ती आणि तांत्रिक कामांसाठी रविवारी, तिन्ही रेल्वे मार्गिकांवर मेगाब्लाॅक

मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी तिन्ही रेल्वे मार्गावर 26 सप्टेंबर 2021 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते दिवा दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिकेसाठी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 10 तासांचा ब्लाॅक घेतला आहे. त्यामुळे अप दिशेकडील जाणाऱ्या धीम्या मार्गावरील कळवा आणि मुंब्रा येथे लोकल थांबणार नाही.

20:46 September 24

लैंगिक छळ : अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी दोघांना अटक

बुलडाणा - तालुक्यातील एका छोट्या गावात अल्पवयीन 17 वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गेल्या सात दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर या मुलीच्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेली सुसाइड नोट घरात आढळल्याने आत्महत्येच्या कारणाचा खुलासा झाला आहे. ज्यामध्ये या मुलीवर गावातीलच दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याने, त्याला कंटाळून या तरुणीने आत्महत्या केल्याचे नमूद आहे. या दोन तरुणांपैकी एक जण हा मृत तरुणीचा चुलत भाऊ असल्याचे समोर आले आहे. 

18:44 September 24

ओशो आश्रमातीत गैरकारभाराची भारत सरकारने चौकशी करावी, अनुयायांची मागणी

मुंबई - आचार्य रजनीश तथा ओशो यांच्या आश्रमातीत गैरकारभाराची भारत सरकारने चौकशी करावी, अशी मागणी ओशो अनुयायांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली आहे. ओशो आश्रम संचातक कोट्यवधींचा महसूल चोरून परदेशात पैसा पाठवित आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.

18:41 September 24

सोमैयांना कोल्हापुरात येऊ द्यावे, मुश्रीफ यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

कोल्हापूर - भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमैया यांना कोल्हापुरात येऊ द्यावे. त्यांना कोल्हापुरात येऊन काय करायचे आहे ते त्यांनी येऊन करावे. माझ्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध करायचा नाही. माझ्या आवाहनाला साथ देणार नाही तो माझा कार्यकर्ता नाही, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. शिवाय सोमैया यांनी सुद्धा कोल्हापुरात येऊन जिल्ह्यातील शांतता बिघडेल असे कोणतेही वक्तव्य करू नये, असेही मुश्रीफ यांनी यावेळी म्हटले.

16:37 September 24

सहा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण! आरोपीला नवघर पोलिसांनी केली अटक

मीरा भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे हद्दीत एका सहा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याबाबत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २२ वर्षीय नाराधामला पोलिसांनी अटक करून ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता मंगळवार २८ सप्टेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सदर आरोपी हा शेजारी असल्याची माहिती मिळाली आहे.

16:28 September 24

राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार

राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरला सुरू होणार हे निश्चित झाले आहे. यासंदर्भातील शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. कोरोना नियम पाळून शाळा सुरू होणार आहेत.

16:08 September 24

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : आतापर्यंत 28 आरोपी ताब्यात

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणी आतापर्यंत 28 आरोपींना पकडण्यात आले असून यातील दोन अल्पवयीन असल्याची माहिती एसीपी सोनाली घुले यांनी दिली आहे. शुक्रवारी सकाळी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अटकेची कारवाई सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. पीडितेची प्रकृती स्थिर असून आरोपी पीडितेच्या ओळखीतील आहेत असे त्यांनी सांगितले.

15:06 September 24

राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होती, 12 आमदारांसंबंधी नव्हती - नाना पटोले

नागपूर - विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत 12 आमदाराचा कुठलाही विषय चर्चेत नव्हता. ही चर्चा राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीची होती, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ते नागपूर विमानतळ येथे माध्यमांशी बोलत होते.

14:13 September 24

गोवा पोलिसांनी सहा सट्टेबाजांना केली अटक

गोवा - गोवा पोलिसांनी वास्को येथे सहा सट्टेबाजांना अटक केली आहे. यातील पाच नागपूर आणि एक राजस्थान मधील आरोपी आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएल सामन्यांमध्ये ते सट्टा लावत होते.

13:57 September 24

मुंबई -

मुंबई कोर्टाने टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितला ड्रग्स प्रकरणात जामीन मंजूर केला

50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय शहर सोडता येणार नाही या अटींवर जामीन मंजूर

आरोपपत्र दाखल करेपर्यंत त्याला प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागणार 

13:55 September 24

मुंबई -

महाराष्ट्र सरकारने महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास 12 तासांवरून 8 तास करण्याचा निर्णय घेतला

महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडेंची माहिती

13:53 September 24

औरंगाबाद -

औरंगाबाद कोर्टाने राष्ट्रवादी युथ विंगचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराच्या प्रकरणात पोलिसांनी दिलेला 'बी सारांश' अहवाल फेटाळला. तपास अधिकारी "राजकारण्यांच्या प्रभावाखाली" असल्याने आरोपीला कधीच अटक झाली नाही, असे म्हटले.

13:53 September 24

मुंबई -

मुंबई विमानतळाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने एका झांबियन नागरिकाला ट्रॉली बॅगमध्ये लपवलेल्या 3.584 किलो हेरॉईनसह अटक केली. त्याची किंमत सुमारे 18 कोटी रुपये आहे.

13:51 September 24

ठाणे -

ठाण्यातील दिवा भागात असणाऱ्या डम्पिंग ग्राउंडवर घनकचरा टाकणाऱ्या गाड्यांची गावकऱ्यांनी अडवणूक

गाडी खाली झोपून पालिकेच्या विरोधात गावकऱ्यांची घोषणबाजी

जोपर्यंत दिवा डम्पिंग ग्राउंड हटत नाही तोपर्यंत या ठिकाणी एकही घनकचरा गाड्यांना येऊ देणार नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे

अनधिकृतपणे शेतकऱ्यांच्या जागेवर डंपिंग होत असून याचा मोबदला पालिका प्रशासन देत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

13:49 September 24

पुणे -

नितीन गडकरी पुण्यात म्हणाले...

1. कात्रज कोंढवा रस्त्यावर अपघातांची मालिका खंडित करण्यासाठी डबलडेकर पुल तयार करण्याची मान्यता

2. अपघाताची मालिका खंडित करण्यासाठी एक टीम काम करणार

3. फलटण कडेपठार मार्गाची आखणी ,  

4.सातारा कागल उद्या भूमी पूजन.

5. सुरत नाशिक ते सोलापूर गुलबर्गा ते केरळ 1270 किमी चा रस्ता तयार करणारा आहे. त्यामुळे दक्षिणेतून येणाऱ्या वाहतूक मुळे होणारे प्रदुषण कमी होणार.

6. 1600 किमी ता रस्ता 1270 किमी चा होणार  

7. पुणे ते मंगरोल, फलटण सातारा असा  मार्ग तयार करणारं  

8. पालखी मार्ग निविदा काढण्यात यश 12 हजार कोटीचा मार्ग

9. पुणे मेट्रो, विमान आणि रेल्वे  आणि रिंग रोड वर काम करण्याची तयारी आहे मात्र अजित पवारांनी मदत करावी

महाराष्ट्राची प्रगती व्हावी, संतांची भूमी तर आहेच . पण तो जगात डेव्हलमेंट च्य दृष्टीने मोठा व्हावा ही सदिच्छा

13:40 September 24

भाईंदर -

मुंबईतील भाईंदर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली 22 वर्षीय तरुणाला अटक

आरोपी विरोधात कलम 376AB, 363,506 IPC आणि POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल

नवघर पोलिसांची माहिती

13:36 September 24

नागपूर -

बिहारच्या भागलपूर पोलिसांना खुलं आव्हान देणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला नागपूर पोलिसांनी केली अटक

गेल्या पाच वर्षांपासून हा आरोपी नागपूर शहरातील मोमीनपुरा भागात लपून राहत होता

बिहार येथून फरार झाला तेव्हा मला कोणतेही पोलीस अटक करू शकणार नाहीत, असे चॅलेंज भागलपूर पोलिसांसह तेथील एसपीला सोशल मीडियावरून दिले होते

राका को पकड कर दिखाओ, राखा वापस आ रहा है, हिसाब लेने के लिए, असे चॅलेंज त्याने एसीपीला केले होते.

13:34 September 24

पुणे -

अजित पवार -  

1. मी समाज कारण राजकारण करणारं कार्यकर्ता आहे. नागरिकांची नाराजगी ओढवून काही उपयोग नाही.

ज्या नागरिकांची जमीन आपण रस्ते रुंदीकरणाला वापरात आहोत त्यांना योग्य मोबदला देणं गरजेचं

2. केंद्रातील हक्काचा माणूस म्हणजे नितीन गडकरी अजित पवाराकडून नितीन गडकरींच् कौतुक

3. कोरो ना काळात केंद्र अनी राज्याची आर्थिक परिस्थिती अडचणीत

4. कामे वेळेत पूर्ण करण्याची सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे

5. नवीन तंत्रण्यानाचा अवलंब करून मेट्रो आणि सहापदरी रस्त्याची   तरतूद करण्याची गरज.

6. राज्यातील जमिनीचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू.

7. देशामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य राहील या साठी प्रयत्न करू

नीलम गोऱ्हेंच्या मागण्या -

1. राज्य आणि केंद्रातील पुल भक्कम होणे गरजेचे आहे

2. प्रत्येकाचा हेतू स्वच्छ पण विचारांचं आदानप्रदान महत्त्वाचं

3. पुण्याचं प्रदूषण वर काम करण्यासाठी धोरणात्मक काम करण्याची गरज.

4. पाण्याची, हवेची, प्रदूषण बाबत जिल्हानिहाय स्तरावर काम करावं.

5. दिल्ली ते मुंबई रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव.

6. मुंबई आणि वरळी सी लिंक हा खूप स्तुत्य उपक्रम

सुप्रिया सुळे - 

औरंगाबाद ते अजिंठा रस्ता हा लवकर पूर्ण करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. जागतिक स्तरावरील पर्यटन स्थळाकडे जाण्याच्या मार्गाचे काम प्रलंबित आहे, ते लवकर पूर्ण झाले तर मराठवाड्याच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल, असेही खासदार सुळे म्हणाल्या. दरम्यान, औरंगाबाद ते वेरुळ रस्त्याचेही रुंदीकरण करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना केली.

13:22 September 24

ठाणे -

मागील काही दिवसाच्या वाहतूक कोंडीनंतर आता ठाण्याच्या पालकमंत्र्यांनी या वाहतूक कोंडीची दखल घेत उपाययोजना करण्यासाठी आज या रस्त्याचा दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यात ठाण्यापासून भिवंडी पर्यंतच्या भागाची एकनाथ शिंदे पाहणी करणार आहेत.

12:55 September 24

नाशिक ब्रेकिंग

महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांमध्ये पुन्हा वाद उफाळला

सेना आमदार सुहास कांदे यांची छगन भुजबळांच्या विरोधात हायकोर्टात धाव

नियोजन समितीचा निधी भुजबळांनी विकल्याचा आमदार सुहास कांदे यांचा आरोप

या प्रकरणाच्या चौकशीसाठी कांदेंची थेट न्यायालयातच धाव

याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी देखील प्रतिवादी

भुजबळांनी निधी विकल्याचे 500 पुरावे असल्याचा आमदार सुहास कांदे यांचा दावा

काही दिवसांपूर्वी कांदे आणि भुजबळ यांच्यात झाली होती ऐन बैठकीत खडाजंगी

12:52 September 24

कोल्हापूर ब्रेकिंग

पेट्रोल पंप चालकांनाच कमी मिळतंय पेट्रोल

कोल्हापुरातील अनेक पेट्रोल पंपावर डीलरकडून पेट्रोल कमी मिळत असल्याचा प्रकार उघड

पेट्रोल पंप चालकांनी उघडकीस आणला घोटाळा

त्याबाबत संबंधितांवर कारवाई करावी, अशी पेट्रोल पंपधारकांची मागणी

वाहतुकीवेळी पेट्रोल-डिझेल गायब होत असल्याचा प्रकार उघडकीस

मात्र ई लॉकिंग सिस्टीममुळे पेट्रोल-डिझेल गायब कसे होते?, असा प्रश्न निर्माण झालाय

12:45 September 24

नागपूर -

'कालची मुख्यमंत्री यांची भेट ही केवळ ओबीसी आरक्षणा संदर्भात होती. या भेटीमध्ये कुठलहीही राजकीय चर्चा  झाली नाही. ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा कसे देता येईल, यावर ती भेट होती. यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष होते. यात काही माझे सजेशन होते, ते त्यांना सुचवले आहे. ते त्यांनी मान्य केले. मला विश्वास आहे, की ते सजेशन मान्य केल्यास सर्वोच न्यायालयात आपली केस टिकेल आणि ओबीसी आरक्षण परत मिळेल', असा विश्वास राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला.

12:40 September 24

नागपूर -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत 12 आमदारांच्या निलंबनावर झाली नसल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

खासदार राजू सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेवर रिकाम्या झालेल्या एक जागेसाठी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीकडून रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. तर, ती जागा काँग्रेसची होती. महाराष्ट्रची परंपरा आहे. ती काँग्रेसची जागा आहे, आमची सिट असल्याने ती द्यावी अशी विनंती फडणवीसांना केली. चर्चा करून निर्णय घेऊ आणि दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले, असे पटोलेंनी म्हटले.

12:35 September 24

अहमदनगर -

साई संस्थांच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाच्या अडचणीत वाढ कायम

शिर्डी साईबाबा संस्थानवर गेल्या काही दिवसापूर्वी नव्याने नेमलेल्या 11 सदस्यांच्या नेमणुकीबाबत शासनाने न्यायालयात कोणतीही सूचना न देता परस्पर या विश्वस्त मंडळाने पदभार स्वीकारला

नवनियुक्त विश्वस्त मंडळाने कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असा आदेश मुंबई खंडपीठाच्या औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिला होता.

तोपर्यंत संस्थानचा कारभार तदर्थ समिती पाहणार असल्याचेही न्यालयाने सांगितले होते.

या प्रकरणाची औरंगाबाद उच्च न्यायालयात सुनावाई झाली. हा निकाल कायम ठेवत यावर येत्या 4 ऑक्टोबर रोजी सुनावाई होणार असल्याची माहिती याचिकाकर्त्याचे वकील अजिंक्य काळे यांनी दिली आहे.

11:58 September 24

डोंबिवली -

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज दुपारी २ वाजता डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी मानपाडा पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेणार

10:45 September 24

पुणे -

सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाईम थिएटर असा नव्याने उभारला उड्डाण पूल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते या उड्डाणपुलाचं होणार उद्घाटन

आज 10: 30 वाजता होणार उदघाटन

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारी राहणार उपस्थित

10:44 September 24

औरंगाबाद -

कुख्यात गुन्हेगार टिप्याच्या दोन साथीदारांसह मैत्रिणीने हर्सूल कारागृह रक्षकाला सुमारे दोन लाख रुपयांना 18 सप्टेंबर रोजी लुटले होते. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. दरम्यान, गुन्हे शाखा पोलिसांनी टिप्याची मैत्रीण आणि दोन्ही साथीदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी रात्री एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

10:43 September 24

औरंगाबाद -

पुराच्या पाण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची गावकऱ्यांनी सुटका

पुराच्या पाण्यात मानवी साखळी बनवून विद्यार्थ्यांची सुटका

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पळशी गावातील घटना  

विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर झाला जोरदार पाऊस

पावसामुळे अंधारी परिसरातील नाल्याला आला तुफाण पूर

पूर ओसरत नसल्यामुळे गावकऱ्यांनी मानवी साखळी बनवत विद्यार्थ्यांची केली सुटका

गावकऱ्यांनीच राबवलं अंगाचा थरकाप उडवणारं रेस्क्यू ऑपरेशन

10:41 September 24

मुंबई -

'भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे संवेदनशील आहेत. त्यांच्या भावनांचा नक्कीच विचार केला जाईल. आपल्या राज्यात महिलांवर अत्याचार व्हावे असे कोणालाही वाटत नाही. महाराष्ट्र स्त्रियांचा सन्मान राखतो, वाईट प्रवृत्तीचा नाश करतो. महिलांच्या अत्याचार आणि सन्मानाबाबत सरकार संवेदनशील आहे', असेही संजय राऊत म्हणाले.

10:39 September 24

मुंबई -

संजय राऊत छगन भुजबळांबद्दल म्हणाले, की 'छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत. नाशिकचे पालकमंत्री आहेत. ते महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यांनी शिवसेना आमदार सुहास कांदे यांना सांभाळून घ्यावं. तेही समीर आणि पंकज यांच्या सारखे आहेत. कोणाला अहंकार नसावा, तरच आघाडी सरकार पुढे जाईल'.

10:37 September 24

मुंबई -

'राज्यात सिनेमागृह सुरू करण्याबाबत सिनेमागृह चालक-मालक संघटनेसोबत चर्चा झाली आहे. मुंबई हे नाट्यभूमी, सिनेमागृहाचं जनक आहे. सिनेमागृह उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करू आणि हळूहळू सिनेमागृह सुरू करू. दोन वर्षात सिनेमागृहांची स्थिती खराब झाली. लाखो लोकांचा रोजगार त्यावर आहे', असे शिवसेना खासदार राऊतांनी म्हटलंय.

09:23 September 24

मुंबई -

शेअर बाजारात नवा उच्चांक

सेन्सेक्स 375 अंकांनी वाढून 60,260 वर

तर निफ्टी 106 अंकांनी उडी मारून 17,929 वर

07:05 September 24

Breaking News Update

तुळजाभवानी मातेचे शारदीय नवरात्र उत्सव यंदाही भक्ताविनाच

तुळजापूर शहरात भाविकांना यंदाही प्रवेश बंदी

जिल्हाधिकारी यांनी घेतला निर्णय

भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Last Updated :Sep 24, 2021, 9:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.