Athiya Shetty-KL Rahul Wedding : अथिया शेट्टी आणि के एल राहुल अडकले लग्न बंधनात; इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर
Updated on: Jan 24, 2023, 10:37 AM IST

Athiya Shetty-KL Rahul Wedding : अथिया शेट्टी आणि के एल राहुल अडकले लग्न बंधनात; इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर
Updated on: Jan 24, 2023, 10:37 AM IST
अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज विकेटकीपर के एल राहुल हे सोमवारी विवाह बंधनात अडकले. केएल राहुल अथिया या दोघांचा विवाह सोहळा काही मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळीसोबत लोणावळ्यात एका फार्महाऊसवर मोठ्या उत्साहात पार पडला. पाहा नवविवाहित जोडप्याचे खास फोटो.
मुंबई : लोणावळा येथे फार्म हाऊसवर अवघ्या शंभर पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्नगाठ बांधली. या लग्नाबाबत दोन्हीकडच्या कुटुंबांनी कामालीची गुप्तता पाळली होती. कोणालाही त्यांच्या लग्नाबाबत सांगण्यात आले नव्हते. मात्र सोमवारी लोणावळ्यात एका फार्म हाऊस सायंकाळी हे लग्न पार पडल्यानंतर स्वतः अभिनेत्री अथिया शेट्टी हिने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी सांगितली आहे.
लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर : आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत असताना अथियाने सुंदर कॅप्शनही त्या फोटो सोबत दिले आहे. तुझ्यामुळे, मी प्रेम कसे करावे हे शिकले. आमच्या सर्वात प्रियजनांसोबत, आम्ही त्या घरात लग्न केले ज्या घराने आम्हाला खूप आनंद आणि शांतता दिली. कृतज्ञता आणि प्रेमाने भरलेल्या अंतःकरणाने, आम्ही या एकत्रतेच्या प्रवासात तुमचे आशीर्वाद मागतो असे कॅप्शन अथिया हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर लिहिलेेल आहे. इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी देखील त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. सर्वच चाहत्यांनी तिला पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबईमध्ये रिसेप्शनची ग्रँड पार्टी होणार : अथिया आणि के एल राहुल या दोघांच्याही कुटुंबांनी या लग्नाबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. तर दोन्ही कुटुंब आणि जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार मिळून केवळ शंभर लोकांमध्ये हे लग्न पार पडला. या लग्न सोहळ्याला सिनेजगतातून अनुपम खेर, अर्जुन कपूर, जॅकी श्रॉफ, आणि क्रिकेट जगतातील ईशान शर्मा यांनी हजेरी लावली होती. लवकरच लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टी दोन्ही कुटुंबाकडून आयोजित करण्यात येणार आहे. या पार्टीला सिनेजगत आणि क्रिकेट जगतातील मोठे स्टार उपस्थित राहतील.
चार वर्षापासून सुरू होत अफेअर : चार वर्ष आधी अथिया आणि के एल राहुल एका मित्राच्या पार्टीमध्ये भेटले होते तिथे त्या दोघांची ओळख झाली या ओळखीत रूपांतर तर हळूहळू प्रेमात झाले. गेल्या वर्षभरापासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सिनेजगत आणि क्रिकेट विश्वात होत्या. अनेक वेळा हे दोघेही पार्टी समारंभात एकत्र दिसायचे. त्यामुळे हे दोघेही लवकरच लग्न करतील असे वाटत असतानाच आतिया आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांच्या लग्नाची गोड बातमी दिली आहे.
