Latur Crime : गुंगीचे औषध देऊन अनाथ मुलीवर बलात्कार, पाच जणांविरोधात लातूरात गुन्हा

author img

By

Published : Jan 22, 2023, 8:49 AM IST

Latur  orphan girl rape

शैक्षणिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या लातूर शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पार्टी करू असे सांगत एका अनाथ मुलीला अंबाजोगाई रोडवरील शेतात गुंगीचे औषध पाजवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लातूर : पीडित मुलीच्या तीन मैत्रिणींच्या मदतीने रिक्षा चालकाने हा अत्याचार केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत तीन महिलांसह पाच जणांविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे लातूर शहरात खळबळ उडाली आहे.

लातूर शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेणारी 16 वर्षीय अनाथ मुलगी शहरात राहते. शुक्रवारी (दि.१८ जानेवारी,2023) रोजी ती नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली होती. दुपारी कँटीनमध्ये बसल्यानंतर तिच्या अन्य तीन मैत्रिणी तिथे आल्या. त्यांनी आपण पार्टी करु सांगत तिला अंबोजोगाई रोडवरील निर्जनस्थळी ज्वारीच्या शेतात नेले. तिथे यातील एका मैत्रिणीने नवऱ्याला फोन करुन घटनास्थळी बोलावून घेतले. तिचा पती घटनास्थळी एका ॲटोरिक्षा चालकाला सोबत घेवून आला. त्यानंतर त्यांनी पीडित मुलीला गुंगीचे औषध पाजले. रिक्षा चालकाने तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने यास विरोध केला असता तिला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिची शुध्द हरपली. त्यानंतर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आरोपी ॲटोरिक्षा चालकाने पीडितेला त्याच्या रिक्षातून सोडले.

पाच जणांविरोधात गुन्हा दाखल: पीडित मुलगी शुद्धीवर आल्यावर तिने शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात जावून आपबीती सांगितली. पीडितेने दिलेल्या जबाबावरुन पिडीतेच्या तीन मैत्रीणी, एका मैत्रिणीचा पती, ॲटोरिक्षा चालक अशा पाच जणाविरोधात एमआयडीसी पोलिसांत 41/23 कलम 376(2)(जे), 328,506,34 भादंविसह कलम 3 (अ)(क) ४ (1)(2) 7,8 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या गुन्ह्यातील एका महिला आरोपीस अटक करण्यात आली आहे. अन्य चार आरोपी अद्याप फरार असल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजिवन मिरकले यांनी ईटीव्ही भारतशी दुरध्वनीवरुन बोलताना सांगितले आहे.

बिहारमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार : बिहारमधील पाटणा शहरात आठवीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना नुकतेस समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तीन नराधमांना अटक केली आहे. ३ जानेवारीला मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात सातत्याने गुंतले आहे. पोलिसांचे एक पथकही तयार करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता अल्पवयीन विद्यार्थिनी कोचिंगमधून शिक्षण घेऊन घरी परतत होती. त्यामुळे वाटेत चार नराधमांनी त्याला पकडून बळजबरीने सुनसान रस्त्यावर नेले. एका खोलीत 4 नराधमांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.