मराठवाड्यात निझाम राज्य असल्याने रेल्वेचा विकास नाही -रावसाहेब दानवे

author img

By

Published : Oct 3, 2022, 4:51 PM IST

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे कार्यक्रमात बोलताना

मराठवाडा प्रांत हा रेल्वेबाबत मागास आहे. कारण मराठवाड्यात इंग्रज नाही तर निझामांची सत्ता होती. निझामांना रेल्वेची गरज नव्हती. त्यामुळे आजपर्यंत रेल्वेचा विकास झाला नाही असे मत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, खासदार इम्तियाज जलील विरोधक आहेत. मात्र, ते भाजपचे वाटतात. ते कुठली मागणी संभाजीनगरसाठी नाही तर औरंगाबादसाठी करतात. म्हणून अडचण येते अशी मिश्किल टीका रावसाहेब दानवे यांनी जाहीर कार्यक्रमात केली आहे.

औरंगाबाद - राज्याचा रेल्वे निधी वाढला - बाहेरून मंत्री आल्यावर स्थानिक नेत्यांना आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. आजपर्यंत आम्ही अनेक वेळा मागण्या केल्या. मात्र, त्या अद्याप त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. २००९ पासून २०१४ पर्यंत महाराष्ट्राला अकराशे कोटी मिळत होते. आता अकरा हजार करोड रुपये मिळत आहेत. हे महाराष्ट्राला मिळत आहेत आणि ते महाराष्ट्रासाठी खर्च होतात. २०२३ पर्यंत रेल्वेचे इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण होईल. टीका करणारे असतात. विजेवर रेल्वे चालली तर पैसे वाजतील. बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत असही ते म्हणाले आहेत. मराठवाड्यात लातूर येथे शंभर वंदेमातरम रेल्वे गाड्या तयार होत आहेत. औद्योगिक विकास होत आहेत. सर्व काम पूर्ण झाली तर विरोधकांना बोलायला काही राहणार नाही अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली आहे. पुढच्या निवडणुकीत काय मुद्दे असतील असा प्रश्न त्यांना पडेल. यावेळी औरंगाबादसाठी १८० कोटी खर्च करून विकास होणार, वेरूळ लेणी नुसार आधारावर डिझाईन होईल. जालना स्टेशनसाठी देखील निधी देण्यात आला असही दानवे म्हणाले आहेत.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे कार्यक्रमात बोलताना

एकाच वेळी अनेक स्टेशनचे काम - दोनशे स्टेशन एकाच वेळी डिझाईन तयार झाले आहेत. त्यात ३२ स्टेशनवर काम सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रेल्वेशी लहानपनापासून भावनिक नाते आहे अस केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. रेल्वे स्टेशन विकसित होत आहेत. युरोप आणि जपानपेक्षा अधिक चांगले एक पाऊल पुढे जाऊन टाकणार आहोत. यामध्ये आधुनिक गाड्यांसह २०० स्टेशन निर्मिती होणार आहे असही ते म्हणाले आहेत. तसेच, जागतिक दर्जाच्या गाड्या सुरू होतील असही ते म्हणाले आहेत.

अत्याधुनिक गाड्या धावतील - लातूर येथे वेंदे मातरम् गाड्यांची निर्मिती होईल. त्यासाठी प्रक्रिया पुर्ण झाल्या आहेत. तिथे प्रत्येक वर्षी नवनवीन बदल होऊन गाड्या तयार होतील. रेल्वेत मोठा बदल घडेल. याची कल्पना आज करता येणार नाही. नव्या पिढीसाठी चांगली यंत्रणा सज्ज होईल. शिर्डीसाठी सेवा मिळेल. भारत गौरव यात्रा योजनेत शिर्डी समवेश असून ही गाडी सुरू झाली. ऐतिहासिक वस्तूसाठी अशाच गाड्या सुरू करणार आहोत असही ते म्हणाले आहेत. रेल्वे स्टेशनवर स्थानिक उत्पादकता विक्री वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. बाजारपेठ तयार केली जात आहे. त्यासाठी रेल्वे सोबत जोडले जाणे आवश्यक आहे असही त्यांनी मत व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रासोबत याआधी निधी देताना भेदभाव केले गेले. मात्र, मोदींनी निधी चारपट वाढवला. अनेक प्रकल्प बंद होते ते सुरू केले. त्यासाठी अनेक बदल करण्यात आले. अधिकाऱ्यांना ऊर्जा देण्यात आली. प्रोत्साहन देण्यात आले. रोज ७ किलोमिटर रोज निर्मिती होतो होती. आता १४ किलोमिटर रोज नवे काम होत आहेत. अनेक मागण्या आल्या आहेत. नेहमी येत असतात. याबाबत नव्या पद्धतीने पुढे जाण्याचे नियोजन आहे. यात जुने काम संपून नवीन काम सुरू केली जातील असेही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.