रामनगर साखर कारखान्यावरून खोतकर-सोमैय्या आमने-सामने

author img

By

Published : Nov 24, 2021, 12:39 PM IST

रामनगर साखर कारखान्यावरून खोतकर-सोमैय्या आमने-सामने

भाजप नेते किरीट सोमैय्यांनी(Kirit Somaiya) जालन्यातील रामनगर साखर कारखाना(Ramnagar Sugar Factory, Jalna) खरेदी-विक्री प्रकरणी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर(Arjun Khotkar) यांच्यावर निशाणा साधलाय. त्यामुळे रामनगर साखर कारखाना चर्चेत आला आहे.

जालना : भाजप नेते किरीट सोमैय्यांनी(Kirit Somaiya) जालन्यातील रामनगर साखर कारखाना(Ramnagar Sugar Factory, Jalna) खरेदी-विक्री प्रकरणी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर(Arjun Khotkar) यांच्यावर निशाणा साधलाय. त्यामुळे रामनगर साखर कारखाना चर्चेत आला आहे. याविषयीचा हा खास रिपोर्ट...

औरंगाबादमधील दोन उद्योजकांच्या कार्यालयावर पडलेल्या ईडीच्या धाडीमुळे जालन्यातील रामनगर साखर कारखाना चर्चेत आहे. या कारखान्याच्या खरेदीवरून भाजप नेते किरीट सोमैय्यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर निशाणा साधलाय. अर्जुन खोतकर यांनी मात्र आपण या कारखान्याचे मालक नसून केवळ शेअर होल्डर असल्याचं स्पष्ट केलंय. राज्यात 2014 पूर्वी आघाडी सरकार असताना सरफेसी कायद्याअंतर्गत राज्य सहकारी बँकेकडून या कारखान्याची 42.31 कोटींना विक्री करण्यात आली. औरंगाबादमधील उद्योजकांनी हा कारखाना खरेदी केला. त्यानंतर याच उद्योजकांकडून 2014 मध्ये अर्जुन शुगर इंडस्ट्रीने हा कारखाना खरेदी केल्याचा आरोप किरीट सोमैय्यांनी केलाय.

जालन्यातील रामनगरमधे असलेल्या या कारखान्याकडे 217 एकर जमीन आहे. हा कारखाना विकू नये अशी मागणी सभासदांसह या परीसरातील शेतकऱ्यांनी केली होती. पण राज्य सहकारी बँकेने कर्जाच्या वसुलीसाठी कारखान्याची विक्री केली. त्यामुळे कारखान्याच्या परिसरातील शेतकरी नाराज झालेत. परिसरातील ऊस शेतीही नाहीशी झाली. आजही या कारखान्यातील अनेक कामगारांचे पगार थकलेले आहेत. त्यामुळे हा कारखाना पुन्हा सुरू करावा अशी मागणी सभासद आणि शेतकऱ्यांनी केली आहे.

जालना जिल्ह्याचे माजी खासदार बाळासाहेब पवारांनी या कारखान्याची मूहुर्तवेढ रोवल्यानंतर हा कारखाना 1987 साली सुरु झाला. त्यानंतर 10 वर्षे कारखाना चांगला चालला. मराठवड्यातील सर्वात जलद कर्जमुक्त होणारा हा पहिलाच रामनगर सहकारी साखर कारखाना होता. पण नंतर कारखान्याने घेतलेले 11 कोटी रूपयांवरील व्याज 20 कोटी रुपये होऊन एकूण थकबाकी 31 कोटी झाली आणि अखेरीस हा कारखाना कर्जाच्या बोजापायी राज्य सहकारी बँकेने विक्री केला. तेव्हापासून आजपर्यंत हा कारखाना बंदच आहे. कारखान्याची भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी चौकशीची मागणी केलीय. त्यामुळे हा कारखाना पुन्हा चर्चेत आलाय.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.