आरोग्य विभागाच्या परीक्षा गोंधळावर बोलण्यास राजेश टोपे यांचा नकार, म्हणाले...

author img

By

Published : Nov 1, 2021, 4:45 PM IST

Updated : Nov 1, 2021, 7:07 PM IST

rajesh tope

राज्यात आरोग्य विभागाची 'ड' गटासाठीची परीक्षा पार पडली. या परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा आहे. परीक्षेतील या गोंधळाबाबत राजेश टोपे यांनी भाष्य करण्यास नकार दिला आहे.

जालना - रविवारी(31 ऑक्टोबर) राज्यात आरोग्य विभागाची 'ड' गटासाठीची परीक्षा पार पडली. या परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा आहे. परीक्षेतील या गोंधळाबाबत राजेश टोपे यांनी भाष्य करण्यास नकार दिला आहे. कोरोनापाठोपाठ म्यूकरमायकोसिसचे रुग्ण राज्यात नियंत्रणात आले आहेत ही चांगली बाब असल्याचे टोपे यांनी सांगितले. ते जालन्यात बोलत होते.

आरोग्यमंत्री राजेश टोपे

हेही वाचा - आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा सावळा गोंधळ; जळगावात उमेदवारांचे परीक्षा क्रमांक ऐनवेळी बदलले

  • कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात -

म्यूकरमायकोसिस रुग्णांसाठी महागडी औषधं मोफत केली असून, ट्रीटमेंट चांगली देण्यात आल्याचा हा परिणाम असल्याचे देखील टोपे यांनी सांगितले. दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल रेल्वे खुली करण्यात आली आहे. मात्र, रेल्वेच्या जनरल डब्यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना तिकीट देता येणार नसल्याने प्रवाशांची नाराजी आहे. याबाबत देखील आरोग्यमंत्र्यांनी भाष्य केले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडे राज्य शासनाकडून या संदर्भात विनंती केली जाईल. या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे टोपे म्हणाले. तसेच दुसरा डोस घेण्यासाठी राज्यातील 75 लाख नागरिकांनी पाठ फिरवली असून, नागरिकांनी दुसरा डोस घेण्याचे आवाहन टोपे यांनी केले. या संदर्भात आरोग्य विभागाकडून कारवाई करून अशा नागरिकांना दुसरा डोस दिला जाईल, असेही ते म्हणाले.

  • नियम पाळत दिवाळी साजरी करा -

राज्यात चिकनगुनियाचे रुग्ण वाढले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाकडून योग्य उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच दिवाळीनिमित्ताने गर्दी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी भान ठेवूनच दिवाळी साजरी करावी. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन देखील टोपे यांनी केले. फटाक्यांबाबत पर्यावरण विभागाने काढलेल्या अधिसूचना पाळाव्यात, असेही ते म्हणाले.

रशिया आणि चीनमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे विमानतळावर योग्य काळजी घेण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार आहे. या संदर्भात केंद्राच्या आरोग्य विभागाकडे योग्य मागणी करून आंतरराष्ट्रीय विमानतळावर काळजी घेण्याची मागनी करू, असेही टोपे यांनी सांगितले.

हेही वाचा - आरोग्य विभागाचा गोंधळ थांबेना, 'ड' गटाचा पेपर फुटल्याचा विद्यार्थ्यांचा दावा

Last Updated :Nov 1, 2021, 7:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.