माजी खासदार पुंडलिक हरी दानवे यांचे निधन

author img

By

Published : Nov 1, 2021, 3:49 PM IST

Updated : Nov 1, 2021, 9:34 PM IST

Former MP Pundalik Hari Danve passes away

जालना लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पुंडलिक हरी दानवे यांचे आज दि.०१ रोजी सकाळी दहा वाजता वयाच्या ९५ व्या वर्षी दु:खद निधन झाले. दीड महिन्याच्या रुग्णालयांतील अथक व शर्थींच्या प्रयत्नांवर नियतीने मात केली अन् एक प्रामाणिक देशभक्त खासदार, महाराष्ट्रातील व देशातील जुने जाणते तत्वनिष्ठ राजकीय व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले.

जालना - माजी खासदार पुंडलिक हरी दानवे (९०) यांचे सोमवारी सकाळी साडेदहा वाजता औरंगाबाद येथे निधन झाले. माजी खासदार पुंडलिक हरी दानवे यांनी वयाची ९३ वर्षे पूर्ण केली होती, दोन वेळा खासदार राहिलेले असतानाही औरंगाबाद येथे घर असताना ते भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सुतार येथेच वास्तव्यास होते.

दीड महिन्यापासून होते आजारी -

जालना लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पुंडलिक हरी दानवे यांचे आज दि.०१ रोजी सकाळी दहा वाजता वयाच्या ९५ व्या वर्षी दु:खद निधन झाले. दीड महिन्याच्या रुग्णालयांतील अथक व शर्थींच्या प्रयत्नांवर नियतीने मात केली अन् एक प्रामाणिक देशभक्त खासदार महाराष्ट्रातील व देशातील जुने जाणते तत्वनिष्ठ राजकीय व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले.

मुळ गावी होणार अंत्यसंस्कार -

माजी खासदार पुंडलिक हरी दानवे यांच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम दि.०२ रोजी, दुपारी साडे बारा वाजताच्या दरम्यान त्यांच्या मूळगावी पिंपळगाव (सुतार) ता. भोकरदन येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात पुत्र माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे, बबनराव पुंडलिकराव दानवे, सुधाकर पुंडलिकराव दानवे, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Former MP Pundalik Hari Danve passes away
खासदार सुप्रिया सुळे यांची पोस्ट

सुप्रिया सुळे यांनी वाहिली श्रद्धांजली -

जालना लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पुंडलिक हरी दानवे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे तत्वनिष्ठ समाजकारण व राजकारण करणारे एक जुने जाणते नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण दानवे कुटुंबीयांसोबत आहोत. अशा शब्दांत राष्ट्रवादी नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी खासदार पुंडलिक दानवे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा - ट्विट करत अमृता फडणवीस यांनी साधना मंत्री नवाब मलिकांवर निशाणा

Last Updated :Nov 1, 2021, 9:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.