Marathwada Liberation Day: जालन्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण

author img

By

Published : Sep 17, 2022, 3:53 PM IST

Updated : Sep 17, 2022, 4:29 PM IST

Abdul Sattar

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त Marathwada Liberation Day जालन्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं. शहरातील टाऊन हॉल परिसरात हे ध्वजारोहण पार flag Hoisting in the Town Hall area पडले. यावेळी राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातील असंही ते Assurance of panchnama of crop damage म्हणाले.

जालना - मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त Marathwada Liberation Day जालन्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं. शहरातील टाऊन हॉल परिसरात हे ध्वजारोहण पार flag Hoisting in the Town Hall area पडले. तसेच मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना यावेळी सत्तार यांनी अभिवादन केलं.यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्यासह अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान जिल्ह्यात झालेल्या हुतात्मा स्मारकाची दुरुस्ती करण्यात येऊन सुशोभीकरण केलं जाईल असं आश्वासन सत्तार यांनी Flag hoisting by Abdul Sattar दिलं.

अब्दुल सत्तार

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे - राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातील असंही ते Assurance of panchnama of crop damage म्हणाले. सत्तार यांच्या विद्यार्थ्यांना पाचवीपासून शेतीचे धडे देण्यात येतील घोषणेवर सर्व बाजूंनी टीका होतीय मात्र आपण हे वाक्य सकारात्मक दृष्टीने म्हणालो असून नोकरी नाही लागलीच तर विद्यार्थी चांगला शेतकरी व्हावा या हेतूने म्हणालो असून यामुळे काहींना पोटशूळ उठल्याचा पलटवार त्यांनी केला.राज्यातील 27 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची रक्कम जमा केल्याच देखील सत्तार यांनी म्हटलं आहे.



केंद्राला प्रस्ताव पाठवू - NDRF कडून जी मदत मिळते यात बदल करण्याचा अधिकार हा केंद्राचा आहे त्यामुळे हे बदल करण्यासाठी केंद्राला प्रस्ताव पाठवू असंही त्यांनी म्हटलं आहे. मागच्या सरकारमध्ये तिजोरीत खडखडाट होता की नाही हे अजित दादालाच माहीत आहे या सरकारमध्ये तिजोरीत खडखडाट असता तर शेतकऱ्यांना मदत केली असती का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित Abdul Sattar criticize Ajit Pawar केला.

Last Updated :Sep 17, 2022, 4:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.