Navneet Rana: तुम्ही ठाकरे आहात तर मी पण राणा आहे; राणांची शिवसेनेवर टीका

author img

By

Published : Sep 6, 2022, 5:56 PM IST

Updated : Sep 6, 2022, 6:57 PM IST

नवनीत राणा

लव जिहादचा आपण लवकरच खात्मा करणार असून शिवाय आपल्याला जेलमध्ये टाकणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडली आहे. ये तो सुरूवात है, पिक्चर तो अभी बाकी है.' (Navneet Rana) असे म्हणून खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना इशारा दिला आहे. जळगाव येथे त्या माध्यमांशी बोलत होत्या.

जळगाव - देशात सध्या गाजत असलेले लव जिहादचा आपण लवकरच खात्मा करणार असून शिवाय आपल्याला जेलमध्ये टाकणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडली आहे. (Navneet Rana Criticism of Shiv Sena) ये तो सुरूवात है, पिक्चर तो अभी बाकी है.' असे म्हणून खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना इशारा दिला आहे. जळगाव शहरातील महाराणा प्रताप मित्र मंडळाच्या वतीने गणरायाची आरती व हनुमान चालीसा पठणासाठी राणा दाम्पत्य जळगावात दाखल झाले. त्यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.

नवनीत राणा
नवनीत राणा

या कार्यक्रमात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आम्ही त्यांना हनुमान चालिसाचे पठण करण्याचेही आव्हान दिले होते याची आठवणही त्यांनी करून दिली आहे. या कार्यक्रमाला तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. त्यावेळी राणा यांनी आपल्या स्टाईलने भाषण केले. त्यामध्ये अभी ये तो ट्रेलर हे, पिच्चर अभी बाकी है असा फिल्मी डायलॉगही मारला आहे.

Last Updated :Sep 6, 2022, 6:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.