Two farmers Suicide Hingoli : धक्कादायक! दोन अल्पभूधारक शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

author img

By

Published : May 30, 2022, 10:54 AM IST

suicide

एका अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफाश घेतल्याची घटना कळमनुरी ( Two farmers from hingoli district commit suicide ) तालुक्यातील कामठा शिवारात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना ताजी असताना दुसऱ्या एका ही शेतकऱ्याने ( farmers suicide hingoli district news ) आत्महत्या केली आहे.

हिंगोली - एका अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफाश घेतल्याची घटना कळमनुरी ( Two farmers from hingoli district commit suicide ) तालुक्यातील कामठा शिवारात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना ताजी असताना दुसऱ्या एका ही शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. गोपाळ रामराव मोरे (वय 22) असे तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. तर, दुसऱ्या घटनेत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे गजानन विश्वनाथ खंदारे (वय 35 रा. पिंपळखुटा ता. जि. हिंगोली) असे नाव आहे.

हेही वाचा - A series of accidents : राष्ट्रिय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच;तीन दिवसात सात जणांचा मृत्यू

गोपाल मोरे यांच्याकडे कामठा शिवारात एक एकर शेती आहे. त्यातून ते आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत असत. घरी आई वडील, भाऊ असा परिवार असून, एक एकर शेतीवर घर संसार चालविणे कठीण होऊ लागले, त्यामुळे ते ट्रॅक्टरवर जाऊन घर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असत. रविवारी सकाळी अकाराच्या सुमारास ट्रॅक्टर चालक म्हणून मशागतीच्या कामासाठी गेले होते. गोपाळ मोरे यांनी ट्रॅक्टरच्या सहायाने एक ते दीड एकराचे रोटवेटर केले. नंतर ट्रॅक्टर धुऱ्याच्या कडेला झाडाखाली उभा करून, रोटावेटरवर उभे राहून गळफास घेतला. ही धक्कादायक बाब परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात येताच काही शेतकऱ्यांनी आखाडा बाळापूर पोलिसांना माहिती दिली. बाळापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविला.

याच दिवशी दुसऱ्याही शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या - कामठा येथील शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर काही वेळाने पुन्हा एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. गजानन विश्वनाथ खंदारे (वय 35 रा. पिंपळखुटा ता. जि. हिंगोली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गजानन यांच्याकडे वडिलोपार्जित केवळ अर्धा एकर शेती आहे. त्यातून काही रोजमजूरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असत, मात्र शेतातील उत्पन्नात मोठी घट आणि हाताला काम मिळत नसल्याने, मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. अशातच त्यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवन यात्रा संपवली. बासंबा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेह शविच्छेदनासाठी जिल्हासामान्य रुग्णालयात हलविला. या प्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यावरून शेतकरी खरोखरच किती आर्थिक संकटात आहेत, हे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.

हेही वाचा - नाचण्यावरून उद्भवला वाद, तर काहींना काढल्या तलवारी; लग्न न लावताच नवरदेवाने काढला पळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.