चहाच्या टपरित गॅसचा स्फोट, हॉटल जळून खाक

author img

By

Published : Nov 9, 2021, 1:48 PM IST

चहाच्या टपरित गॅसचा स्फोट, हॉटल जळून खाक

ओंढा नागनाथ येथे मंदिर परिसरात असलेल्या चहाच्या हॉटेलमध्ये गॅस स्फोट होऊन हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना सोमवारी मध्ये रात्री दिडच्या सुमारास घडली आहे. यामध्ये सुदैवाने कोणितीही जीवित हानी झालेली नसली तरी हॉटेलचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे.

हिंगोली- ओंढा नागनाथ येथे मंदिर परिसरात असलेल्या चहाच्या हॉटेलमध्ये गॅस स्फोट होऊन हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना सोमवारी मध्ये रात्री दिडच्या सुमारास घडली आहे. यामध्ये सुदैवाने कोणितीही जीवित हानी झालेली नसली तरी हॉटेलचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे. हा स्फोट एवढा भयंकर होता की, परिसरात याचा हादरा जाणवत होता तसेच आजूबाजूला असलेल्या हॉटेल सारखा मध्ये देखील या स्फोटामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चहाच्या टपरित गॅसचा स्फोट, हॉटल जळून खाक

हॉटेल जळून खाक

बाळू सोनूने अस या हॉटेल मालकच नाव आहे. नागनाथ मंदिर परिसरात हॉटेल असून, नेहमी प्रमाणे हॉटेल बंद करून सोनूने घरी गेले होते.तर अचानक स्फोट झाला अन हॉटेल जळून खाक झाली. यामध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ तसेच चहा बनवण्याचे साहित्य आदी हजाराच्यावर नुकसान झाले आहे.

पोलीस पथकांनी घेतली घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच औंढानागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तातडीने धाव घेतली. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. तहसीलदार कृष्णा कानगुले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. घटनास्थळी इतर कोणतेही दुकानं नसल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.