Superstitions In Hingoli : हिंगोलीत अंधश्रद्धेचा कळस; सहा महिन्यांची चिमुकली देवी असल्याचा समज, दर्शनासाठी गर्दी

author img

By

Published : Sep 9, 2022, 9:16 AM IST

Updated : Sep 9, 2022, 2:37 PM IST

Superstitions In Hingoli

सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथे Superstitions at Kapadsingi in Hingoli घडला असून, येथे एका सहा महिन्यांच्या चिमुलिच्या कपाळावर लाल आणि पिवळसर रंग दिसत असल्यांन तिला देवीचाच अवतार Avatar of Goddess in Kapadsingi समजला जात आहे.

हिंगोली - काही केल्या अंधश्रद्धेच्या Superstitions in Hingoli प्रकाराला आळा बसत नाहीये, असाच एक प्रकार सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथे Superstitions at Kapadsingi in Hingoli घडला असून, येथे एका सहा महिन्यांच्या चिमुकलिच्या कपाळावर लाल आणि पिवळसर रंग दिसत असल्याने तिला देवीचाच अवतार Avatar of Goddess in Kapadsingi समजला जात आहे. तिच्या दर्शनासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर परराज्यातून भाविक दाखल होत आहेत. एवढेच नव्हे तर येथे येणाऱ्या महिलांच्या अंगात येत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हिंगोलीत अंधश्रद्धेचा कळस

परराज्यातूनही भाविक दाखल - कापडसिंगी तांडा येथील सुभाष तनपुरे Subhash Tanpure from Kapadsingi Tanda यांच्या कुटुंबात सहा महिन्यापूर्वी एका चिमुरडीचा जन्म झाला. काही दिवसानंतर या चिमुकलीच्या कपाळावर कुंकवासारखा रंग दिसत होता. आता हा रंग जास्तच गडद दिसत असून, याची सर्वत्र चर्चा पसरली. त्यामुळे महिला या चिमुरडीला देवीचाच अवतार समजू लागल्या आहेत. चिमुरडीला बघण्यासाठी महिला वर्ग एकच गर्दी करीत आहे. येथे केवळ एकट्या हिंगोली जिल्ह्यातुनच नव्हे तर परराज्यातूनही भाविक दाखल होत आहेत. चिमुरडीची पूजा- अर्चा केली जात आहे.


ग्रामस्थ गेले गोंधळून - अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गाव तर चांगला गोंधळून गेला आहे. शिवाय जिल्ह्यातही या चिमुरडीची चांगलीच चर्चा होत आहे. पाहण्यासाठी, चिमुकलीचे दर्शन घेण्यासाठी महिला मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. एवढेच नव्हे तर इथे येणाऱ्या महिलांच्या अंगामध्ये येत असल्याने एकच गोंधळ उडाला आहे.

घरात निघाल्या दगडाच्या मूर्त्या - सुभाष तनपुरे यांच्या घरात दीड महिन्यांपूर्वी जमिनीत दगडाच्या मुर्त्या निघाल्या होत्या. नंतर मुलीच्या कपाळावर मळवट भरलेले दिसले, तर काही दिवसांनी हातावर देखील मळवट दिसून येत होते. याची अफवा सर्वत्र पसरल्यानंतर येथे दर्शनासाठी एकच गर्दी होत आहे. मात्र, महिलांच्या अंगात येत असल्याने प्रचंड अंधश्रद्धा दिसून येत आहे. हे सर्व चुकीचे असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रकाश मगरे यांनी सांगितले.

हेही वाचा - Bharat Jodo Yatra Day 2: भारत जोडो यात्रेचा दुसरा दिवस; सर्वांचा सफेद कपडे अन् बूट असा पेहराव

Last Updated :Sep 9, 2022, 2:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.