Murder In Dispute : विद्युत रोहित्राच्या दुरुस्ती वीज बिलावरून एकाचा खून ; गुन्हा दाखल

author img

By

Published : Nov 17, 2022, 2:20 PM IST

Updated : Nov 17, 2022, 2:44 PM IST

Murder over electricity bill

शेतात सार्वजनिक असलेल्या रोहित्राच्या वीज बिलावरून झालेल्या वादात एकाचा खून झाल्याची घटना (murder in dispute In Hingoli) घडली. ही घटना हिंगोली तालुक्यातील बासंबा येथे बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास (dispute over power bill repair of electric switch) घडली.

हिंगोली : शेतात सार्वजनिक असलेल्या रोहित्राच्या वीज बिलावरून झालेल्या वादात एकाचा खून झाल्याची घटना (murder in dispute In Hingoli) घडली. ही घटना हिंगोली तालुक्यातील बासंबा येथे बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास (dispute over power bill repair of electric switch) घडली. गजानन गणपत घुगे (40) असे मयताचे नाव आहे.

विद्युत पुरवठ्याची दुरुस्ती सार्वजनिकरित्या : सध्या रब्बीचा हंगाम सुरू असून शेतकरी रब्बी पिकांना एक पाणी देण्यासाठी रात्रंदिवस एक करीत आहेत. अशाच परिस्थितीमध्ये बासंबा येथे शेत शिवारात सार्वजनिक असलेल्या रोहितरांमध्ये अनेक शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा केला जातो. या विद्युत पुरवठ्याची जी काही दुरुस्ती असते ती सार्वजनिकरित्या केली जाते, या दुरुस्तीचा व विजबिलाचा हिशोब हा दरवर्षी एकेकाकडे सोपविला जातो. दुरुस्ती झाल्यानंतर संपूर्ण हिशोब आणि वीज बिल जमा केले जाते. नंतर त्याचा भरणाही केला जातो, अशाच परिस्थितीमध्ये गजानन घुगे आणि ज्ञानेश्वर घुगे यांच्यामध्ये वाद (power bill repair of electric switch) झाला.

गुन्हा दाखल : हा वाद एवढ्या टोकाला गेला की, यामध्ये गजानन यास प्रचंड मारहाण करण्यात आली. मारहाण झाल्याची माहिती गजाननने आपल्या भावांना दिली होती, भाऊ घटनास्थळी पोहोचतात तोच गजानन मृता अवस्थांमध्ये आढळून आला. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी बासंबा पोलीस दाखल झाले. याप्रकरणी राजू गणपत घुगे यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर उर्फ नानाराव लिंबाजी घुगे याच्या विरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक व्ही.डी. श्रीमनिवार करत (Murder In Dispute) आहेत.

Last Updated :Nov 17, 2022, 2:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.