Rahul Gandhi : राजू भाऊ अमर रहे; खासदार राहुल गांधी यांची हिंगोलीतील राजीव सातव यांच्या स्मृतिस्थळाला भेट

author img

By

Published : Nov 13, 2022, 10:10 PM IST

Rahul Gandhi visits  Rajiv Satav memorial site

हिंगोली : कन्याकुमारी पासून निघालेली भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Hingoli) दाखल झाली असून आज कळमनुरी येथे यात्रा मुक्कामी आहे. दरम्यान खा. राहुल गांधी यांनी दिवंगत नेते राजीव सातव यांच्या स्मृतिस्थळी भेट देऊन (MP Rahul Gandhi visits Rajiv Satav memorial site) सातव यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन (greets Rajiv Satav statue) केले. Latest Update Bharat Jodo Yatra, Latest news from Hingoli

हिंगोली : कन्याकुमारी पासून निघालेली भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Hingoli) दाखल झाली असून आज कळमनुरी येथे यात्रा मुक्कामी आहे. दरम्यान खा. राहुल गांधी यांनी दिवंगत नेते राजीव सातव यांच्या स्मृतिस्थळी भेट देऊन (MP Rahul Gandhi visits Rajiv Satav memorial site) सातव यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन (greets Rajiv Satav statue) केले. यावेळी काही क्षण राहुल गांधी भावुक झाल्याचे दिसून आले. 'राजीव सातव अमर रहे'च्या घोषणाने परिसर दणाणून गेला होता. तर प्रज्ञा सातव देखील भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. Latest Update Bharat Jodo Yatra, Latest news from Hingoli

राहुल गांधी यांची राजीव सातव यांच्या स्मृतिस्थळाला भेट

राजीव सातव यांना अभिवादन- भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे दाखल झाली आहे. आज या ठिकाणी यात्रा मुक्कामी आहे. खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते सातव यांच्या कळमनुरी येथील कोहिनूर निवासस्थानाजवळ असलेल्या राजीव सातव यांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले. तेथे त्यांनी राजीव सातव यांना पुष्पहार अर्पण करून, अभिवादन केले.

बालकांच्या महोत्सवात रमले राहुल गांधी- नंतर सातव यांच्या मातोश्रीची देखील विचारपूस केली आणि गांधी यांनी कळमनुरी शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर बालकांच्या महोत्सवात भेट देत कलाकार बालकसोबत ढोल वाजवत सहभाग घेतला. यावेळी मैदानावर मोठ्या संख्येने नागरींग उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.