हळदीच्या पिकात गांजाची लागवड, शेतकऱ्याकडून १४३ झाडे जप्त

author img

By

Published : Dec 2, 2021, 2:37 AM IST

farmer cultivate ganja in turmeric crop

वसमत तालुक्यातील गुंडा शिवारात एका शेतकऱ्याने थेट हळदीच्या पिकात अंतर पीक म्हणून गांजाची लागवड केल्याची धक्कादायक घटना हट्टा पोलिसांच्या छाप्यात उघड झाली आहे. शेतकऱ्याकडून 6.69 लाख रुपयांचा 76.69 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

हिंगोली - वसमत तालुक्यातील गुंडा शिवारात एका शेतकऱ्याने थेट हळदीच्या पिकात अंतर पीक म्हणून गांजाची लागवड केल्याची धक्कादायक घटना हट्टा पोलिसांच्या छाप्यात उघड झाली आहे. शेतकऱ्याकडून 6.69 लाख रुपयांचा 76.69 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उत्तम मारोतराव भालेराव ( वय 55 रा. गुंडा. ता. वसमत ) असे आरोपी शेतकऱ्याचे नाव आहे.

आरोपी आणि गांज्याची झाडे

हेही वाचा - Hingoli : हिंगोलीत आता कोरोना लस घेणाऱ्यालाच मिळणार पेट्रोल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

शेतकरी भालेराव याने आपल्या हळदीच्या शेतामध्ये गांजाची लागवड केली होती. याची गोपनीय माहिती हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांना कळताच पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मोरे, पठाण, अरविंद गजभार आदींनी भालेराव यांचे शेत गाठून या ठिकाणी छापा टाकून 6 लाख 69 हजार रुपयांची 76.69 किलोची गांज्याची 143 झाडे जप्त केली आहे. या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - रस्त्यावरील खड्ड्यांने केला घात; जवानाच्या बंदुकीतून गोळी सुटून लागली छातीत; जवानाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.