कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा उघडण्याचा निर्णय घेणार - वर्षा गायकवाड

author img

By

Published : Sep 21, 2021, 8:36 PM IST

varsha gaikwad

कोरोनाची परिस्थिती काय राहणार याकडे लक्ष ठेऊन आहोत. तसेच येत्या काही दिवसात रुग्ण संख्या कमी झाल्यास शाळा उघडण्यासंदर्भात पुढील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येईल, असेही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

हिंगोली - संपूर्ण राज्यात गणेश विसर्जनाच्या गर्दीनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी हिंगोलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शाळा बंद असल्याने, शालेय विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे, याची आम्हाला जाण आहे. मात्र, त्यांची काळजी करणे गरजेचे आहे. सर्व विचार करूनच राज्यात याआधी जुलै महिन्यात शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यातही आला होता. तसा प्रस्ताव देखील मुख्यमंत्र्याकडे पाठविण्यात आला होता. नंतर बालरोगतज्ज्ञ तसेच शिक्षणतज्ञांशी चर्चाही करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केल्याने, शाळा उघडण्याचा निर्णय हा मागे घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

काय परिणाम होईल याकडे लक्ष
अजूनही आपण कोरोनातून सवरलेलो नाही. अधून मधून कोरोना रुग्ण आढळून येतातच, त्यामुळे भय अजून कमी झालेले नाही. गणेश विसर्जनाच्या दिवशीच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यामध्ये कोरोनाची परिस्थिती काय राहणार याकडे लक्ष ठेऊन आहोत. तसेच येत्या काही दिवसात रुग्ण संख्या कमी झाल्यास शाळा उघडण्यासंदर्भात पुढील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येईल, असेही शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाचा - लेटरवॉर.. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर; म्हणाले राज्यपालांची 'ही' कृती संसदीय लोकशाहीला मारक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.