Youth Died in Hingoli सेल्फीचा छंद बेतला जीवावर; युवकाचा रेल्वे खाली येऊन मृत्यू

author img

By

Published : Aug 17, 2022, 4:31 PM IST

Youth Died in Hingoli

तरुणाचा रेल्वे समोर सेल्फी घेताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगोलीत ही घटना घडली आहे. स्वप्नील लहाळे ( वय २०, रा. पुणे ) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव 20 year youth died hit by train in hingoli आहे.

हिंगोली - सध्या महागडे मोबाईल बाजारामध्ये दाखल झाले आहेत. या महागड्या मोबाईलमध्ये सेल्फी घेण्याची क्रेझ युवकांमध्ये चांगलीच निर्माण झाली आहे. त्यात आता एका तरुणाचा रेल्वे समोर सेल्फी घेताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगोलीत ही घटना घडली आहे. स्वप्नील लहाळे ( वय २०, रा. पुणे ) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव 20 year youth died hit by train in hingoli आहे.

स्वप्नील हा हिंगोली येथील आपल्या नातेवाईकाकडे आला होता. त्याला सेल्फी काढण्याचा छंद जडला होता. तो ज्या ठिकाणी सुंदर स्थळ दिसेल किंवा हिरवळ दिसेल तो तिथे आपल्या मोबाईलद्वारे सेल्फी टिपत असे. अशाच परिस्थितीमध्ये तो हिंगोली येथील रेल्वे रुळाच्या बाजूला मृतावस्थेमध्ये आढळून आला.

कानात होते हेडफोन - हिंगोली शहरापासून काही अंतरावर रेल्वे रुळाच्या बाजूला एका तरुणाचा मृतदेह आढळला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे, जमादार संजय मार्के, डोंगरदिवे, शेषराव पोले, शेख मुजीब यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केली असता सदरील युवकाच्या कारणांमध्ये हेडफोन असल्याचे आढळून आले, तर त्याच्या शर्टवर ग्रीस लागल्याचे दिसले. त्यामुळे धावत्या रेल्वे समोर फोटो काढण्याच्या नादात मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे.

दुपारपासून तो होता बेपत्ता - स्वप्नील आपल्या नातेवाईकाकडे आला होता. तो सोमवारी १५ ऑगस्ट रोजी दुपारपासून गायब होता. अचानक तो रेल्वे खाली आल्याची माहिती समोर आली. त्याला सेल्फी काढण्याचा छंद असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकाने दिली.

सोशल मीडियावरून पटली ओळख - पोलिसांनी स्वप्नीलचे फोटो हे विविध सोशल मीडिया तसेच विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवरती शेअर केले. त्यामुळे सदरील युवक हा पुणे येथील असल्याची माहिती पुढे आली. तर स्वप्नीलला सेल्फी काढण्याचा छंद होता. त्यातूनच हा छंद त्याच्या जीवावर बेतल्याचे या घटनेवरुन पुढे आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Aaditya Thackeray कपटी कारस्थानामुळेच सरकार कोसळले, आदित्य ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.