आता गोंदिया विमानतळावर वर्षभर मिळणार वैमानिकांना प्रशिक्षण

author img

By

Published : Aug 2, 2021, 3:49 PM IST

Updated : Aug 2, 2021, 4:11 PM IST

गोंदिया विमानतळ

आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व सुविधायुक्त विमानतळ असल्याने या ठिकाणी वैमानिक प्रशिक्षण केंद्र आहे. त्यामुळे 2007 पासून या विमानतळावर उत्तर प्रदेशातील इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकॅडमी रायबरेलीचे वैमानिक प्रशिक्षक केंद्र आहे.

गोंदिया - गोंदियाच्या विमानतळावर वैमानिकांना वर्षभर प्रशिक्षण मिळणार आहे. जिल्ह्यातील बिरसी विमानतळावर हे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. मागील 14 वर्षापासून सुरू असलेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकॅडमीने या वर्षापासून ही संधी प्रशिक्षण घेणाऱ्या वैमानिकांना दिली आहे. त्यामुळे या विमानतळावर सहा विमान प्रशिक्षणासाठी असून हे प्रशिक्षक विमाने आता या विमानतळावर या वर्षीपासून वर्षभर उपलब्ध राहणार आहेत.

वर्षभर मिळणार वैमानिकांना प्रशिक्षण

वर्षभर मिळणार प्रशिक्षण

गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील विमानतळावर वैमानिक प्रशिक्षण केंद्र असून या विमानतळावर केवळ हिवाळ्याचे चार महिनेच प्रशिक्षण दिले जात होते. मात्र आता या विमानतळावरून वर्षभर प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे आता नियमित छोटी विमाने उडत असल्याचे दृश्य जिल्हावासियांना पाहायला मिळणार आहे. बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून लवकरच या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला सुध्दा प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या विमानतळाचे महत्त्व अधिक वाढणार असून या परिसरात रोजगाराच्या नवीन संधी सुध्दा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे जिल्हावासियांच्या दृष्टीने ही आनंदाची बाब आहे.

200 हून अधिक वैमानिकांना प्रशिक्षण

आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्व सुविधायुक्त विमानतळ असल्याने या ठिकाणी वैमानिक प्रशिक्षण केंद्र आहे. त्यामुळे 2007 पासून या विमानतळावर उत्तर प्रदेशातील इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकॅडमी रायबरेलीचे वैमानिक प्रशिक्षक केंद्र आहे. मात्र पूर्वी गोंदिया या बिरसी विमानतळावरून केवळ हिवाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीतच वैमानिकांना प्रशिक्षण केंद्र सुरू राहत होते. हिवाळ्यात रायबरेली येथे धुक्याची समस्या असल्याने वैमानिकांना प्रशिक्षण घेण्यास अडचण निर्माण होत असल्यामुळे या कालावधीत बिरसी येथील विमानतळावर रायबरेली येथील वैमानिकांना प्रशिक्षण दिले जात होते. मात्र या वर्षीपासून आता बिरसी विमानतळावरूनच वर्षभर वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे बिरसी विमानतळ प्राधिकरनाकडून सांगण्यात आले आहे. बिरसी येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकॅडमी रायबरेलीचे प्रशिक्षण केंद्र असून आतापर्यंत या प्रशिक्षण केंद्रातून आतापर्यंत 200 हून अधिक वैमानिक झाले आहे.

हेही वाचा -16 कोटींचं इंजेक्शन देऊनही वेदिकाचा मृत्यू; दुर्मिळ आजाराने होती ग्रस्त

Last Updated :Aug 2, 2021, 4:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.