नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे आता गोंदियापर्यंत होणार विस्तारीकरण- प्रफुल पटेल

author img

By

Published : Jul 18, 2021, 5:50 PM IST

गोंदिया

नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाचे आता गोंदियापर्यंत विस्तारीकरण होणार आहे, अशी माहीती खासदार प्रफुल पटेल यांनी आज गोंदियात दिली. गोंदिया पोलीस विभागाला एकाच वेळी ४६ नवीन वहानांचे वाटप करण्यात आले. या वहानांचे लोकार्पण करण्यासाठी आले असता प्रफुल पटेल बोलत होते.

गोंदिया - नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाचे आता गोंदियापर्यंत विस्तारीकरण होणार आहे, अशी माहीती खासदार प्रफुल पटेल यांनी आज गोंदियात दिली. गोंदिया पोलीस विभागाला एकाच वेळी ४६ नवीन वहानांचे वाटप करण्यात आले. या वहानांचे लोकार्पण करण्यासाठी आले असता प्रफुल पटेल बोलत होते.

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचे आता गोंदियापर्यंत होणार विस्तारीकरण- प्रफुल पटेल

'गोंदिया टू मुंबई प्रवास होणार अतीसोपा'

समृद्धी महामार्ग हा आता नागपूरपर्यंत नसून ते गोंदियापर्यंत यावा यासाठी वाटचाल आम्ही सुरू केली आहे. त्याचा सर्व्हे आणि अलायमेंट कसा करायचा याची चर्चा झाली असून लवकरच सर्व्हेला सुरूवात होणार असल्याचीही माहीती खासदार पटेल यांनी यावेळी दिली. जर समृद्धी महामार्गाला गोंदियापर्यंत विस्तारीत करण्यात आले तर महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापर्यंत हा महामार्ग जोडून गोंदिया टू मुंबई प्रवास हा अतीसोपा होणार आहे.

गोंदिया पोलीस विभागाला मिळाले ४६ नवे वाहने, खा. प्रफुल पटेल यांच्याकडून हिरवी झेंडी

गोंदिया जिल्हा पोलीस दलास चारचाकी वाहनांची अत्यंत आवश्यकता असल्याने पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, यांनी वाहन खरेदीकरीता जिल्हा नियोजन व विकास समितीमधून निधी उपलब्ध करुन देणेबाबत पत्रव्यवहार केला होता. त्या अनुषंगाने जिल्हा नियोजन व विकास समिती सदस्यांनी सदर मागणीला तसेच खा. प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याने प्राधान्य देऊन गोंदिया जिल्हा पोलीस दलास लागणाऱ्या वाहनांसाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२०-२१ च्या निधी मध्ये "पोलिस व तुरुंग" या योजनेमधून ३ कोटी ६० लाख १३ हजार २२८ रुपयांची निधी गोंदिया जिल्हा पोलीस दलाकरीता वाहनांची कमतरता असल्याने उपलब्ध करुन देण्यात आले. या निधीतुन वाहने खरेदी करण्यात आलेल्या पैकी ४६ वाहने वाटप करण्यात आले. यापैकी २१ वाहने हे प्रोजेक्ट डायल ११२ करीता वापर करण्यात येणार आहेत. तसेच यापैकी काही वाहन हे गोंदिया जिल्ह्यातील नक्षल भागाकरिता दिले जाणार असून नक्षल भागातही या वाहनांचे महत्वाचे कार्य असतील. या वाहनांचे लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार प्रफुल पटेल, यांच्या हस्ते आज रविवार १८ जुलै रोजी पोलीस मुख्यालय, कारंजा गोंदिया येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रफुल पटेल यांनी या ४६ वाहनांचे लोकार्पण करून या वाहनांना हिरवी झेंडी दाखवली.

हेही वाचा - राज ठाकरे आश्वासक चेहरा, पण परप्रांतीयविरोधी भूमिका बदलावी- चंद्रकांत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.