Two Naxalites Surrendered :  गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवाद्यांचे  आत्मसमर्पण

author img

By

Published : Sep 21, 2022, 1:51 PM IST

Updated : Sep 21, 2022, 5:11 PM IST

Two Naxalites Surrendered

दोन नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या दोन्ही नक्षलवाद्यांवर अनुक्रमे 4 लाख आणि 2 लाख असे एकूण 6 लाख रुपयांचे बक्षीस होते (reward of 6 lakhs Two naxalites surrendered). अनिल आणि रोशनी असे Two naxalites surrendered Gadchiroli पोलिसांना शरण आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.

गडचिरोली - गडचिरोतील दोन नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे (Two Naxalites Surrendered). अनिल उर्फ ​​रामसे कुजूर (२६, रा. गडचिरोली) आणि रोशनी पल्लो (३०, रा. छत्तीसगड) अशी या दोघांची नावे आहेत, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. गोयल यांनी सांगितले की, कुजूरवर ४ लाख आणि पल्लोवर २ लाखांचे बक्षीस होते (reward of 6 lakhs Two naxalites surrendered).

कुजूर हे नक्षल सदस्य म्हणून काम करत होता. 2011 मध्ये खोब्रामेंढा आणि ग्यारापट्टी येथे झालेल्या हल्ल्याच्या दोन घटनांमध्ये आणि त्याच वर्षी छोटा झेलिया जंगलात झालेल्या चकमकीत त्याचा सहभाग होता. पल्लोने आत्मसमर्पण करण्यापूर्वी डेप्युटी कमांडर आणि नक्षल सदस्य म्हणून काम केले होते. ती विविध चकमकी आणि हत्यांमध्ये सामील होती, असे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

नक्षलवादी हिंसाचाराने वेढलेल्या जीवनामुळे निराश आणि कंटाळले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आत्मसमर्पण धोरणाकडे आकर्षित होत आहेत, असे एसपींनी नमूद केले. गडचिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुजूरने त्यांना सांगितले की, ज्येष्ठ नक्षलवादी गरीब आदिवासी तरुणांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करतात. पल्लो याने सांगितले की नक्षलवाद्यांना कोणत्याही कामासाठी पैसे दिले जात नाहीत आणि पुरुष आणि महिला केडरमध्ये वरिष्ठांकडून भेदभाव केला जातो. आत्मसमर्पण करणाऱ्या कुजूर आणि पल्लो यांना पुनर्वसनासाठी प्रत्येकी 5 लाख रुपये मिळणार आहेत. गोयल म्हणाले की 2019 पासून आतापर्यंत 51 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

Last Updated :Sep 21, 2022, 5:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.