बारा लाख रुपयांची बोली असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

author img

By

Published : May 26, 2022, 11:00 AM IST

बारा लाख रुपयांची बोली असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत.

गडचिरोली - शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत.

नक्षलवादी नामे रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम
नक्षलवादी नामे रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम

नुकतेच 12 लाख रुपये बक्षीस असलेले नक्षलवादी नामे रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम, वय 63 वर्ष रा. अर्कापल्ली ता. अहेरी जि. गडचिरोली व माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजु मट्टामी वय 34 वर्ष रा. गट्टेपल्ली पोमके हालेवारा ता. एटापल्ली जि. गडचिरोली या दोन जहाल नक्षलवाद्यांनी मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांच्या समोर आत्मसमर्पण केले आहे.

माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजु मट्टामी
माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजु मट्टामी
  • आत्मसमर्पीत सदस्याबाबत माहीती

    नामे रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम (दलममधील कार्यकाळ)

    माहे मार्च 2005 ला अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन कार्यरत व 03 महिने पेरमिली मध्ये कार्यरत होता.
    माहे मे 2005 पासुन तो माड डिव्हीजन टेक्नीकल दलममध्ये कार्यरत होता.
    सन 2007 ते सन 2012 पर्यंत उप-कमांडर पदावर कार्यरत होता.
    सन 2012 ते मार्च 2022 पर्यंत भामरागड एरीया टेक्नीकल दलममध्ये एसीएम पदावर पर्यंत कार्यरत होता.

कार्यकाळात केलेले गुन्हे

रामसिंग यांचेवर 01 खून, 01 चकमक व इतर 01 असे एकुण 03 गुन्हे दाखल आहेत
मौजा कासमपल्ली, गुंडुरवाही, हीकेर, आशा-नैनगुडा, आलदंडी चकमकीत तो सहभागी होता.

माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजु मट्टामी

  • दलममधील कार्यकाळ

    नोव्हेंबर 2002 ला कसनसुर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन ती माहे डिसेंबर 2012 पर्यंत
    कार्यरत होती.
    माहे डिसेंबर 2012 ते सन 2013 पर्यंत भामरागड दलममध्ये कार्यरत होती.
    माहे फेब्राुवारी 2013 ते माहे एप्रिल 2022 पर्यंत पेरमिली दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होती.
    कार्यकाळात केलेले गुन्हे
    माधुरी हीचेवर 04 खून, 21 चकमक, 07 जाळपोळ व इतर 05 असे एकुण 37 गुन्हे दाखल आहेत.
    मौजा वेळमागड, कसनासुर व माडवेली चकमकीमध्ये सहभागी होती.


    महाराष्ट्र शासनाने जाहिर केलेले बक्षीस-

    महाराष्ट्र शासनाने रामसिंग ऊर्फ सिताराम आत्राम याचेवर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
    माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन मट्टामी हिचेवर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
  • आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रामसिंग ऊर्फ सिताराम आत्राम यास एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे. दरम्यान, गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2019 ते 2022 सालामध्ये आतापर्यंत एकुण 49 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­ऱ्या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छूक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल. तसेच, त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल यांनी केले आहे.

हेही वाचा - पंढरपूरचे मंदिर बौद्ध विहार, आंबेडकर अभ्यासक आगलावे यांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.