'वृक्षांची होणारी कत्तल थांबवून कचऱ्याची होळी करा'; रांगोळीतून दिला नैसर्गिक होळीचा संदेश

author img

By

Published : Mar 17, 2022, 5:50 PM IST

message of natural Holi given through rangoli

होळी सणात केमिकल युक्त कलर्स वापरल्याचे काय दुष्परिणाम होतात. याचाच देखावा गोंदियातील रांगोळी चित्रकार सोनी भावना फुलसुंगे या तरुणीने रांगोळीच्या माध्यमातून दिला आहे. होळी या सणात रंगपंचमीच्या उत्सवात मोठ्या प्रमाणात रंगाची उधळ आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असते, याचे मानवी जीवनावर काय दुष्परिणाम होतात. हेच या रांगोळीच्या माध्यमातून एका महिला चित्रकाराने दाखविले आहे.

गोंदिया - होळी सणात केमिकल युक्त कलर्स वापरल्याचे काय दुष्परिणाम होतात. याचाच देखावा गोंदियातील रांगोळी चित्रकार सोनी भावना फुलसुंगे या तरुणीने रांगोळीच्या माध्यमातून दिला आहे. होळी या सणात रंगपंचमीच्या उत्सवात मोठ्या प्रमाणात रंगाची उधळ आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असते, याचे मानवी जीवनावर काय दुष्परिणाम होतात. हेच या रांगोळीच्या माध्यमातून एका महिला चित्रकाराने दाखविले आहे.

रांगोळीतून दिला नैसर्गिक होळीचा संदेश

रांगोळीतून कचऱ्याची होळी जाळण्याचा संदेश -

गोंदियातील रांगोळी चित्रकार सोनी भावना फूलसुगे या तरुणीने सेव नेचर, सेव ट्री, सेव पीपल, या आधारवर ही रांगोळी साकारली आहे. यात तीन तरुणांनी केमिकल युक्त रंगाचा वापर केला आहे. त्यामुळे त्यांचा चेहरा कसा दिसत आहे तर दुसरीकडे दोन पळसाच्या फुलांचे, बाजी पालेभाज्या आणि फुल फळे यांचा वापर करून तयार केलेल्या हर्बल रंगाच्या पासून तयार केलेला रंग खेळताना दिवस आहेत. सोबतच वृक्षांची होणारी कत्तल थांबवून परिसरातील कुळा कचरा गोळा करून आपले परिसर स्वच्छ ठेवून या कचऱ्याची होळी जाळण्याचा संदेश देखील या माध्यमातून ( Stop tree felling and burn garbage in Holi ) दिला आहे.

Stop tree felling and burn garbage in Holi
रांगोळीतून दिला नैसर्गिक होळीचा संदेश

पर्यावरणाचा समतोल राखा -

विशेषबाब म्हणजे सोनी यांनी तयार केलेल्या रांगोळीतून लहान मुलांना देखील या होळीला आपण कोणते रंग वापरावे, ते किती आपल्यासाठी फादेशीर आहेत. हे रांगोळीद्वारे समजूत घालत या चिमुकल्या मुलांना हर्बल रंग वापरण्याचा संकल्प घेतला आहे. त्यामुळे तुम्ही देखील होळी सॅन साजरा करताना केमिकल युक्त रंगांना ऐवजी हर्बल कलरचा वापर करून पर्यावरणाचे समतोल राखण्यास मदत करा आणि इतरांना देखील प्रोत्साहित करा असे संदेश रांगोळीकार सोनी भावना फुलसुंगे देत आहे.

Stop tree felling and burn garbage in Holi
रांगोळीतून दिला नैसर्गिक होळीचा संदेश

हेही वाचा - BSF Recover Gold Biscuits : बीएसएफची भारत-बांग्लादेश सीमेवर मोठी कारवाई, 40 सोन्याची बिस्कीटे जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.