मोस्ट वॉन्टेड महिला नक्षली नर्मदा अक्काचा मृत्यू, नक्षलवाद्यांचे गडचिरोलीत बंदचे आवाहन

author img

By

Published : Apr 20, 2022, 12:51 PM IST

narmada-akka

दंडकारण्य क्षेत्रातील सक्रिय नक्षली नेत्या कॉम्रेड नर्मदा अक्काचे 9 एप्रिलला निधन झाले. तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ 25 एप्रिल रोजी दंडकारण्य बंदचे ठेवण्याचे आवाहन नक्षल संघटनांनी केले. दंडकारण्य स्पेशल कमिटीचा सचिव विकल्प यांनी याबाबतचे पत्रक जारी केले आहे.

गडचिरोली - कुख्यात नक्षलवादी नेत्या कॉम्रेड नर्मदा अक्काचे निधन झाले आहे. नर्मदा अक्काच्या निधनामुळे नक्षलवाद्यांनी 25 एप्रिलला दंडकारण्यात बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. याबाबतचे पत्र नक्षलवाद्यांनी गडचिरोली परिसरात टाकले आहेत.

गडचिरोली व दंडकारण्य क्षेत्रातील सक्रिय नक्षली नेत्या कॉम्रेड नर्मदा अक्काचे 9 एप्रिलला निधन झाले. तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ 25 एप्रिल रोजी दंडकारण्य बंदचे ठेवण्याचे आवाहन नक्षल संघटनांनी केले. दंडकारण्य स्पेशल जोनल कमिटीचा सचिव विकल्प यांनी याबाबतचे पत्रक जारी केले आहे. नक्षल चळवळीतील सर्वात सक्रिय महिला नेत्या नर्मदा अक्का कार्यरत होती. 42 वर्ष चळवळीत असल्याने कॉम्रेड नर्मदाला नक्षलवादी नर्मदा दी असे संबोधत होते. 9 एप्रिल रोजी अटकेत असलेल्या नर्मदा अक्काचे कर्करोगाने निधन झाले आहे.

मुंबईतील भायखळा कारागृहात नर्मदा अक्का होती अटकेत - नर्मदा अक्का आपल्या पतीसह मुंबईतील भायखळा कारागृहात अटकेत होती. 1980 सालापासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेल्या नर्मदावर महिलांना सक्रिय रित्या चळवळीत आणणे, नक्षल चळवळीचे मुखपत्र असलेल्या प्रभात पत्रिकेचे संपादन यासह दक्षिण गडचिरोली भगत नक्षल चळवळ मजबूत करण्याची जवाबदारी होती. जिल्ह्यातील सुरजागड व दमकोंडवाही या खाणीमुळे होणाऱ्या विस्थापन संदर्भात उठाव करण्यासाठी तिने विविध समित्या तयार केल्या होत्या. 11 जून 2019 रोजी पती किरणसह पोलिसांनी नर्मदाला अटक केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.