8 लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षली दाम्पत्याचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण

author img

By

Published : Jul 30, 2021, 7:57 PM IST

Updated : Jul 30, 2021, 8:16 PM IST

नक्षली

विनोद बोगा व कविता कोवाची हे दोघे पती-पत्नी असून विनोद बोगा हा कोरची दलममध्ये एरिया कमेटी मेम्बर (एसीएम) पदावर दलम डॉक्टर म्हणून कार्यरत होता. त्याची पत्नी कविता कोवाची ही पार्टी मेंबर या पदावर टिपागड दलममध्ये कार्यरत होती.

गडचिरोली - शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. नुकतेच ८ लाख रुपये बक्षीस असलेले नक्षलवादी नामे विनोद ऊर्फ मनिराम नरसु बोगा (वय ३२ वर्ष रा. बोटेझरी, पोमके गॅरापत्ती ता. कोरची जि. गडचिरोली) व कविता ऊर्फ सत्तो हरीसिंग कोवाची (वय ३३ वर्ष रा. गौडपाल ता. मानपूर जि. राजनांदगाव ) यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे.

नक्षली दाम्पत्याचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण
इतक्या लाखांचे होते बक्षीस

विनोद बोगा व कविता कोवाची हे दोघे पती-पत्नी असून विनोद बोगा हा कोरची दलममध्ये एरिया कमेटी मेम्बर (एसीएम) पदावर दलम डॉक्टर म्हणून कार्यरत होता. त्याची पत्नी कविता कोवाची ही पार्टी मेंबर या पदावर टिपागड दलममध्ये कार्यरत होती. विनोद बोगा यांच्यावर खुनाचे १३, चकमकीचे २१ , जाळपोळ ०१ व इतर ०५ असे गुन्हे दाखल असुन पत्नी कविता हीचेवर चकमकीचे ०५, जाळपोळ ०१ व इतर ०३ असे गुन्हे दाखल असून शासनाने विनोद बोगा याचेवर ०६ लाख रूपयाचे तर कविता कोवाची हीच्यावर ०२ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन २०१९ ते २०२१ सालामध्ये एकूण ४३ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये ४ डिव्हीसी, ०२ दलम कमांडर, ०३ उपकमांडर, ३३ सदस्य व ०१ जनमिलीशिया यांचा समावेश आहे.

आत्तापर्यंत इतक्या नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण

सदर नक्षलींचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी, स्वप्निल जाधव यांनी पार पाडली आहे. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केल्याने नक्षली हालचालीवर अंकुश ठेवण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश प्राप्त झाले आहे. आतापर्यंत एकुण ६४७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेले आहे. विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर आहे. जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे.

Last Updated :Jul 30, 2021, 8:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.