रस्त्याअभावी खाट बनली गरोदर मातेची रुग्णवाहिका; गडचिरोलीच्या दुर्गम भागातील भयावह परिस्थिती

author img

By

Published : Mar 12, 2022, 10:49 AM IST

खाट बनली गरोदर मातेची रुग्णवाहिका

नुकतेच दोन दिवस अगोदर भामरागड तालुक्यातील लाहेरीपासुन 18 किमी अंतरावरील कुमनार येथील कुंडरी कमलेश पुंगाटी हिला ९ मार्च बुधवारीला पहाटे पासुन प्रसव वेदना सुरु झाल्या. मात्र गावापर्यंत रस्ता नाही. त्यामुळे बैलगाडीने देखील जाता येत नाही. डोंगराच्या पलीकडे गाव आहे. नाल्यातुन वाट काढत गावकऱ्यांच्या मदतीने खाटेवर टाकुन पायी चालत आणुन रुग्णालयात भरती केले.

गडचिरोली - छत्तीसगड सीमेवरती गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील कोयर टोला (कुमनार) येथील गरोदर मातेला प्रसूतीसाठी रुग्णालयात भरती करायचे होते. मात्र रस्त्याअभावी रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचु शकत नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबातील व गावकऱ्यांनी खाटेवर आणुन लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. सुदैवाने प्रसूतीनंतर बाळ व माता सुखरूप आहे.

गडचिरोलीच्या दुर्गम भागातील भयावह परिस्थिती

बुधवारी सकाळच्या दरम्यान महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवरील कुमनार येथील कुंडरी कमलेश पुंगाटी या 25 वर्षीय गरोदर मातेच्या बाळंतपणासाठी या गावात रस्ते नसल्याने तिला खाटेवर झुला बनवून तब्बल 18 किलोमीटर अंतर पायपीट करुन लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणावे लागले. या घटनेमुळे सीमेवरती गावांना मुलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सीमेवरती गावात मुलभूत सुविधा पोहचल्याच नाही. 75 वर्षे उलट्या तरी आदिवासींचा संघर्ष कायमच आहे. रस्ते आभावी रुग्ण रुग्णालयात वेळेवर पोहोचु शकत नाही.

प्रसूतीनंतर बाळ व माता सुखरूप आहे.
प्रसूतीनंतर बाळ व माता सुखरूप आहे.

नुकतेच दोन दिवस अगोदर भामरागड तालुक्यातील लाहेरीपासुन 18 किमी अंतरावरील कुमनार येथील कुंडरी कमलेश पुंगाटी हिला ९ मार्च बुधवारीला पहाटे पासुन प्रसव वेदना सुरु झाल्या. मात्र गावापर्यंत रस्ता नाही. त्यामुळे बैलगाडीने देखील जाता येत नाही. डोंगराच्या पलीकडे गाव आहे. नाल्यातुन वाट काढत गावकऱ्यांच्या मदतीने खाटेवर टाकुन पायी चालत आणुन रुग्णालयात भरती केले. लगेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्टाप नर्स ए.ए. शेख लगेच उपचार सुरु केले. त्यानंतर सुरक्षित सुखरूप प्रसुती करण्यात आले. 18 किमी खाटेवर झुला बनवून पायी चालत आणण्यासाठी किती तास या गरोदर मातेने वेदना सहन करीत जीवाशी झूंज द्यावी लागली. लागले. असे किती दिवस चालणार असा सवाल ग्रामस्थ करत आहे. इंटरनेटच्या युगात आदिवासी भागातील अवस्था भयावह असल्याचे चित्र समोर आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.