Naxals Arrest In Gadchiroli : लाखोंची बक्षिसे असलेल्या चार नक्षवाद्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

author img

By

Published : Apr 21, 2022, 5:33 PM IST

Updated : Apr 21, 2022, 6:53 PM IST

Naxals Arrest In Gadchiroli

गडचिरोली पोलिसांनी 4 नक्षलवाद्यांना ( 4 Naxal Arrest In Bhamragad ) भामरागड येथून अटक केली आहे. या नक्षवाद्यांवर 18 लाखांची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल ( SP Ankit Goyal ) यांनी दिली आहे.

गडचिरोली - गडचिरोली पोलिसांनी 4 नक्षलवाद्यांना ( 4 Naxal Arrest In Bhamragad ) भामरागड येथून अटक केली आहे. या नक्षवाद्यांवर 18 लाखांची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल ( SP Ankit Goyal ) यांनी दिली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई - नक्षलवाद्यांच्या टिसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र धोडराज हद्दीतील नेलगुंडा जंगल परिसरात विशेष अभियान पथकाच्या जवानांनी चार जहाल नक्षलवाद्यांना अटक केली आहे. नक्षलवादी साध्या वेषात गावामध्ये प्रवेश करून नक्षल कारवाई पार पाडणार आहेत, अशी गोपनिय माहिती पोलीस दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांना यश मिळाले.

अशी आहेत नक्षलवाद्यांची नावे - अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलवाद्यांमध्ये बापू ऊर्फ रामजी दोघे वडे (३०) वर्ष रा. नेलगुंडा ता. भामरागड, मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधु गावड़े (३४) वर्ष रा. कनेली ता. धानोरा, सुमन ऊफ़ जन्नी कोमटी कुड्यामी (२४) वर्ष पडतमपल्ली ता. भामरागड, अजित ऊर्फ भरत रा. झारेवाडा ता.एटापल्ली जि. गडचिरोली यांचा समावेश आहे. जहाल नक्षली बापू बढे हा कंपनी क्र. १० मध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. १४ ऑगस्ट २०२० रोजी पोमके कोठी अंतर्गत पोलीस शिपाई दुशांत पंढरी नंदेश्वर यांच्या हत्येमध्ये याचा सक्रीय सहभाग होता. तसेच त्यांचा १३ गुन्ह्यांमध्ये समावेश आहे. मारोती गावडे हा गट्टा दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. तसेच तो नक्षलच्या अॅक्शन टीमचा सदस्य होता. त्यांचा एकूण ३ चकमकीच्या गुन्ह्यांमध्ये समावेश आहे. सुमन कुड्यामी ही पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तीचा ११ गुन्ह्यांमध्ये समावेश आहे. १३ एप्रिल २०२२ रोजी पोलीस मदत केंद्र गट्टा (जा.) हद्दीमध्ये अशोक ऊर्फ नविन पेका नरोटे व मंगेश मासा हिचामी या दोन निरपराध आदिवासी नागरिकांच्या हत्येच्या कटामध्ये जहाल नक्षली मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधू गावडे अजित ऊर्फ भरत याचा सक्रीय सहभाग होता.

18 लाखांचे होते बक्षीस - नक्षली कारवाई व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने बापू ऊर्फ रामजी दोघे बढे याच्यावर ८ लक्ष रूपये, मारोती ऊर्फ अंतुराम ऊर्फ माणिक साधू गावडे याच्यावर ६ लक्ष रूपये, सुमन ऊफ्र जन्नी कोमटी कुड्यामी हीच्यावर २ लक्ष रूपये व अजित ऊर्फ भरत याच्यावर २ लक्ष रूपये असे एकूण १८ लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. या शिवाय त्याचा आणखी किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे, याचा तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांचे नेतृत्वात पार पडली.

हेही वाचा - Devendra Fadnavis : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यावर फडणवीसांना संशय म्हणाले, 'वसुलीचा..'

Last Updated :Apr 21, 2022, 6:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.