Ganesh visarjan 2022 : विसर्जनात बाप्पाला निरोप द्यायला जाणाऱ्या तरुणानेच घेतला अखेरचा निरोप

author img

By

Published : Sep 10, 2022, 4:20 PM IST

Death of a young man by drowning

बाप्पाला निरोप द्यायला गेलेला राकेश घरी परतलाच नाही, विसर्जन मिरवणुकीत ( Ganesh Idol Immersion Procession ) एक चिंताजनक घटना. राज्यभरात काल दहा दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप दिला गेला. अशातच धुळ्यात गणेश विसर्जना दरम्यान एका तरुणाचा बुडून मृत्यू ( Death of Youth by drowning ) झाल्याची घटना घडली आहे. राकेश आव्हाड असे तरुणाचे नाव आहे. धुळे तालुक्यातील आनंदखेडे गावात ही घटना घडली. गणपती विसर्जन ( Ganesh visarjan )दरम्यान राकेशचा पाय घसरून नदीत पडल्याने दुर्देवी घटना ( unfortunate death ) घडल्याचं समोर आलं आहे.

धुळे :- बाप्पाला निरोप द्यायला गेलेला राकेश घरी परतलाच नाही, विसर्जन मिरवणुकीत ( Dhule Immersion Procession ) चिंताजनक घटना घडली आहे. राज्यभरात काल दहा दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप दिला गेला.अशातच धुळ्यात गणेश विसर्जना दरम्यान एका तरुणाचा बुडून मृत्यू ( youth drown death in Dhule ) झाल्याची घटना घडली आहे. राकेश आव्हाड असे तरुणाचे नाव आहे. धुळे तालुक्यातील आनंदखेडे गावात ही घटना घडली. गणपती विसर्जन दरम्यान राकेशचा पाय घसरून नदीत पडल्याने दुर्देवी घटना ( unfortunate death ) घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गावावर पसरली शोककळा : धुळे तालुक्यातील आनंदखेडे गावात राहणाऱ्या एका तरुणाचा गणेश विसर्जन दरम्यान बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. संपूर्ण राज्यात आज गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना धुळे तालुक्यातील आनंदखेडे गावावर मात्र शोककळा पसरली आहे. गावात राहणाऱ्या राकेश आव्हाड या तरुणाचा विसर्जनादरम्यान पांझरा नदी पात्रात पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राकेश आपल्या मित्रांसोबत गणेश विसर्जनासाठी गेला असताना यावेळी तो फरशी पुलावरील वाळूवरून पाय घसरून फरशी पुलाच्या खाली असलेल्या सिमेंट पाईपात बुडाला. १५ मिनिटानंतर पाईपच्या दुसऱ्या बाजूने तो बाहेर निघाला. त्यास रविकांत सानप आणि ग्रामस्थांनी बाहेर काढून धुळे येथील भाऊसाहेब शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथील डॉक्टरांनी राकेश अशोक आव्हाड यास मृत घोषित केले. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेमुळे आनंदखेडे गावावर शोककळा पसरली आहे.

अशी घडली घटना : तालुक्यातील आनंदखेडा येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश विसर्जनासाठी गेलेल्या इलेक्ट्रिक इंजिनियर असलेल्या तरुणाचा पांझरा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. राकेश अशोक आव्हाड वय 29, राहणार आनंदखेडा असे मृत तरुणाचे नाव आहे. तो दि. 9 रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घरचा गणपती विसर्जनसाठी कुटुंबीयांसह गाव शिवारातील पांझरा नदीवर गेला होतो. त्या दरम्यान या ठिकाणी फरशी असलेल्या वाळुवरुन पाय घसरल्याने राकेश हा पाण्यात पडला. फरशी पुलाच्या खाली असलेल्या सिमेंट पाईपात वाहून गेल्याने पाईपातील पाण्यात बुडाला. त्यामुळे कुटुंबियांनी आरडाओरड केला. सुमारे 15 मिनिटांनी पाईपाच्या दुसऱ्या बाजुकडुन राकेश हा बेशुद्ध अवस्थेत बाहेर निघाल्याने त्यास कुटुंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. त्याला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता तेथील डॉ.अरुणकुमार नागे यांनी तपासणी करून मृत घोषित केले.याबाबत रविकांत बापू सानप यांच्या माहिती वरून तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.