धुळ्यातील दोन तरुणांनी तयार केलेल्या वेबसाईटमुळे शाळेचे कामकाज होणार सोपे

author img

By

Published : Jul 7, 2021, 6:59 PM IST

Updated : Jul 7, 2021, 8:30 PM IST

छायाचित्र

धुळे येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळाच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी शाळेची एक वेबसाईट तयार केली आहे. यामुळे शाळेचे कागदोपत्री कामकाज सोपे झाले असून या तरुणांनी कोविडच्या काळात स्वतःचे स्टार्टअप सुरू करून तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

धुळे - येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळाच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी शाळेची एक वेबसाईट तयार केली आहे. यामुळे शाळेचे कागदोपत्री कामकाज सोपे झाले असून या तरुणांनी कोविडच्या काळात स्वतःचे स्टार्टअप सुरू करून तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

बोलताना युवराज जाधव

धुळे शहरातील श्री विलेपार्ले केळवनी मंडळाच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या सहाव्या सत्रात शिकत असलेल्या युवराज जाधव आणि भूषण मोरे या दोन विद्यार्थ्यांनी एसव्हीकेएम शाळेसाठी एक वेबसाईट तयार केली आहे. यामुळे शाळेचे कामकाज शिक्षकांना करणे सोपे झाले आहे. अत्यंत कमी वेळात आणि कमी खर्चात ही वेबसाइट तयार केल्याबद्दल या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश साळुंखे तसेच विभाग प्रमुख डॉ. भूषण चौधरी, शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा मेनन यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

शाळेसाठी किंवा अन्य कोणत्याही संस्थेसाठी वेबसाईट तयार करण्यासाठी आता नाशिक, मुंबई, पुणे येथे जाण्याची गरज नसून धुळ्यातील या दोन तरुणांनी स्वतःचे स्टार्टअप सुरू करून कोरोनाच्या अनिश्चित काळात तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वेबसाईटचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील शिक्षक आपले दैनंदिन कामकाज खूप सरळ आणि सोप्या पद्धतीने करू शकणार आहेत. विद्यार्थ्यांकडून भरून घेण्यात आलेल्या एका अर्जाच्या मदतीने संबंधित विद्यार्थ्यांची माहिती या वेबसाईटमध्ये संकलित केली जाणार आहे. यासोबत शाळेमधील शिक्षकांची माहितीही या वेबसाईटमध्ये संकलित करणे सोपे जाणार आहे, यासोबत विद्यार्थ्यांचा शालेय दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, प्रगती पत्रक यासह अन्य माहिती पीडीएफ स्वरूपात संकलित करून त्यावर शिक्षकांची आणि मुख्याध्यापकांची डिजिटल स्वाक्षरी करता येणार आहे. यासोबत नवीन माहिती देखील संकलित करणे आणि काढून टाकणे शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना सोपे जाणार आहे, या वेबसाईटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संकलित करण्यात आलेली सगळी माहिती, आकडेवारी कुठेही आणि कधीही पाहता येणार आहे. यासह नवीन तंत्रज्ञान या तरुणांनी विकसित केले आहे.

या तरुणांनी धुळ्यात 'टेक डेस्टीनेशन सॉफ्टवेअर हब' या नावाने आपले माहिती आणि तंत्रज्ञानाचे कौशल्य वापरून स्वतःचे स्टार्टअप सुरू केले आहे. वेबसाईटसह मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्याचे काम आता धुळ्यातच सुरू झाले आहे. यामुळे दैनंदिन कामकाज करणे सोपे होणार आहे.

हेही वाचा - अनैतिक संबंधातून खून अन् केला अपघाताचा बनाव; धुळ्यातील धक्कादायक प्रकार

Last Updated :Jul 7, 2021, 8:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.