शिक्षण विभागाच्या कार्यालयात गर्जना संघटनेचे आंदोलन

author img

By

Published : Jun 24, 2021, 6:05 PM IST

शिक्षण विभागाच्या कार्यालयात गर्जना संघटनेचे आंदोलन

माध्यमिक शिक्षण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरू आहे. या कारभाराच्या विरोधामध्ये गर्जना संघटना आक्रमक झाली आहे. गर्जना संघटनेचे अध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वात आज आंदोलन करण्यात आले.

धुळे - जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या माध्यमिक शिक्षण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरू आहे. या कारभाराच्या विरोधामध्ये गर्जना संघटना आक्रमक झाली आहे. गर्जना संघटनेने शिक्षण विभागात झालेल्या जावक क्रमांकाच्या भ्रष्टाचाराच्या कागदपत्रांचे तोरण बांधून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे.

शिक्षण विभागाच्या कार्यालयात गर्जना संघटनेचे आंदोलन

नोटांचे तोरण बांधून आंदोलन

शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या भोंगळ कारभाराला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. तसेच, येथील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी ही खूप दिवसांची मागणी आहे. मात्र, शिक्षण विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आज गर्जना संघटनेचे अध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वात आज आंदोलन करण्यात आले. धुळे जिल्हा शिक्षण विभाग कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले. भ्रष्टाचार केलेल्या जावक क्रमांक यांच्या कागदपत्रांचे आणि प्रतीकात्मक नोटांचे तोरण बांधून हे आंदोलन करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.