...अखेर कळंबूच्या जवान सुपुत्राची मृत्यूशी झुंज अपयशी; उद्या होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

author img

By

Published : Jul 26, 2021, 10:56 PM IST

देशसेवा बजावितांना कळंबुचा सुपुत्र शहीद

शहादा तालुक्यातील कळंबू गावाचे सुपुत्र निलेश अशोक महाजन यांना वीरमरण आले आहे. निलेश महाजन हे मणिपूर येथे झालेल्या गोळीबारात जखमी होते. शहीद जवान निलेश महाजन हा लहानपणापासून मामांकडे राहत असल्याने तो धुळे तालुक्यातील सोनगीर येथे स्थायिक झाला होता. उद्या मंगळवारी दि.27 रोजी सोनगीर येथे शहीद जवान निलेश महाजन यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

धुळे - शहादा तालुक्यातील कळंबू गावाचे सुपुत्र निलेश अशोक महाजन यांना वीरमरण आले आहे. निलेश महाजन हे मणिपूर येथे झालेल्या गोळीबारात जखमी होते. शहीद जवान निलेश महाजन हे लहानपणापासून मामांकडे राहत असल्याने ते धुळे तालुक्यातील सोनगीर येथे स्थायिक झाला होते. उद्या मंगळवारी दि.27 रोजी सोनगीर येथे शहीद जवान निलेश महाजन यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

देशसेवा बजावतांना कळंबूचा सुपुत्र शहीद, उद्या होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

धुळे तालुक्यातील सोनगीर येथील जवान निलेश अशोक महाजन हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असल्याने मणिपूर येथे कर्तव्य बजावत होते. यावेळी झालेल्या गोळीबारात जवान निलेश महाजन हे जखमी झाल्याने गेल्या आठ महिन्यांपासून त्यांच्यावर गुवाहाटी येथे उपचार सुरु होते. परंतु मृत्यूशी झुंज देत असताना जवान निलेश महाजन यांची प्राणज्योत मालावल्याने ते शहीद झाले.

वडील व काका देखील सैन्यात होते
निलेश यांचे वडिल व काका यांनी देखील सैन्य दलात कर्तव्य बजावले होते. निलेशने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत लहानपणापासूनच सैन्यात जाण्याचा निश्चय केला होता.

बालपनीच आई-वाडिलांचे छत्र हरपले
शहीद जवान निलेश हे लहान असतानाच आई-वडिलांचे छत्र हरपले होते. वडील सैन्यातून सेवा निवृत्त होऊन हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या भावांनी निलेशच्या शिक्षणासाठी मदत केली.

निलेशचा जीवनप्रवास
शहीद जवान निलेश महाजन यांचे प्राथमिक शिक्षण कळंबू येथील जि.प.मराठी शाळा तर पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण कळंबू येथील डी.जी.बी.शेतकी विद्यालयात झाले. तसेच एनसीसीच्या तीन वर्षाचे शिक्षण दोंडाईचा येथील दादासाहेब महाविद्यालयात घेतल्यानंतर नांदेड येथील आर्मी पायु मराठा युनिटमध्ये 2016 मध्ये अगदी कमी वयात 21 व्या वर्षी जवान निलेश हे भरती झाले होते. 1 सप्टेंबर 2016 रोजी कनार्टकच्या बेळगाव येथे प्रशिक्षण पूर्ण करुन देशसेवेच्या कर्तव्यात दिल्ली येथे रुजू झाले. त्यानंतर ते मणिपूर येथे सेवा बजावित होते. आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर जवान निलेश हे शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे राहत होते.

अशी घडली घटना
भारतीय सैन्य दलात त्यांनी पाच वर्ष सेवा बजाविली. परंतु दि.6 नोव्हेंबर 2020 रोजी कर्तव्य बजवितांना मणिपूर येथे झालेल्या गोळीबारात जवान निलेश महाजन हे जखमी झाले होते. त्यांच्यावर गुवाहाटी येथे रूग्णालयात आठ महिन्यांपासून उपचार सुरु होते. अखेर काल उपचारादरम्यान जवान निलेश अशोक महाजन यांचे निधन झाल्याने ते शहीद झाले. त्यांच्या पश्‍चात एक बहिण, मोठा भाऊ असा परिवार असून ते सध्या सोनगीर येथे वास्तव्यास आहे.

सोनगीरला होणार अंत्यसंस्कार
शहीद जवान निलेश महाजन हे मुळचे कळंबूचे असले तरी सोनगीर येथे सध्या वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचे पार्थिव गुवाहाटी येथून विमानात धुळे येथे येईल. तसेच उद्या दि.27 रोजी शासकीय वाहनाने धुळे येथुन सोनगीर येथील राजकुमार नगरातील राहत्या घरापासून शहीद जवान निलेश यांची अंत्ययात्रा शासकीय इतमामात काढण्यात येईल. तर स्वामीनारायण मंदिराच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, असे त्यांचे मोठे बंधु दिपक महाजन व नातेवाईक शैलेश देवरे यांनी सांगितले.

हेही वाचा - राज्यात एक कोटी पूर्ण 'लसवंत', 3.16 कोटी लोकांना मिळाला पहिला डोस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.