अनैतिक संबंधातून खून अन् केला अपघाताचा बनाव; धुळ्यातील धक्कादायक प्रकार

author img

By

Published : Jul 3, 2021, 8:13 AM IST

Updated : Jul 3, 2021, 10:05 AM IST

murder in immoral relation in dhule

मृताच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार व घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांना या अपघाताबाबत शंका उपस्थित झाल्या होत्या. या अनुषंगाने सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. यावेळी मृत संदीप कुमार बोरसे हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम बघत होते.

धुळे - तालुक्यातील सरवड फाट्यावर कारच्या धडकेत मृत्यू झालेल्या जि.प. शिक्षक संदिपकुमार विश्वासराव बोरसे यांच्या मृत्यूची चौकशी करतांना पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. संदिप अनैतिक संबंधात अडचण ठरत असल्याने त्यांच्या मित्रांनीच त्याचा खून केल्याचे उघडकीस आली आहे, अशी धक्कादायक माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

याबाबत माहिती देताना अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव

चौकशीत धक्कादायक सत्य समोर -

मृताच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार व घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांना या अपघाताबाबत शंका उपस्थित झाल्या होत्या. या अनुषंगाने सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील त्यांनी तपासाची चक्रे फिरवली. यावेळी मृत संदीप कुमार बोरसे हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम बघत होते. त्यांच्या पत्नीचे एका पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याने मृत संदीप कुमार हे नेहमीच दारू पिऊन पत्नीला व तिचे अनेतिक संबंध असलेल्या संबंधितास शिवीगाळ करत असत. याचाच राग मनात धरून संबंधित तरुणाने अपघाताचा बनाव करून खून केल्याची तपासत निष्पन्न झाले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी दिली.

हेही वाचा - संचारबंदी उल्लंघन प्रकरणी गोपीचंद पडळकरांसह 25 जणांवर गुन्हा दाखल

5 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी -

या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ समशेर शरद राठोड यास त्याच्या साथीदारांसह ताब्यात घेतले असून या दोघांनीच मिळून संदीप कुमार यांचा नियोजित कट रचून व अपघाताचा बनाव करीत खुन केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ताब्यात घेतलेलल्या दोघांना 5 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीत सुनावण्यात आली असून पुढील तपास सोनगीर पोलीस करीत आहेत.

Last Updated :Jul 3, 2021, 10:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.