Gang War In Dhule धुळ्यात टोळी युद्धात फायरिंग, हत्यारांचा सर्रास वापर करत एक गंभीर जखमी

author img

By

Published : Aug 26, 2022, 4:18 PM IST

Firing In A Gang War

धुळे शहरातील काही नगाव बारी परिसरात गुरुवारी टोळीयुद्ध Gang war in Dhule city झाले. यात तीक्ष्ण हत्यारांचा सर्रास वापर करण्यात आला आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे, जुन्या वादातून ही घटना घडल्याची चर्चा असली तरी नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

धुळे शहरातील काही नगाव बारी परिसरात गुरुवारी टोळीयुद्ध Gang war in Dhule city झाले. यात तीक्ष्ण हत्यारांचा सर्रास वापर करण्यात आलाय. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे, जुन्या वादातून ही घटना घडल्याची चर्चा असली तरी नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. दोन्ही गॅंग मधील दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,तर या घटनेतील फरार आरोपींचा शोध पश्चिम देवपूर पोलीस घेत आहेत.दोन्ही गॅंग मधील दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,तर या घटनेतील फरार आरोपींचा शोध पश्चिम देवपूर पोलीस घेत आहेत.

धुळ्यात टोळी युद्धात फायरिंग, हत्यारांचा सर्रास वापर करत एक गंभीर जखमी




फायरिंग झाल्याची परिसरात चर्चा धुळ्यात यापूर्वी देखील गॅंग वॉरच्या Gang war in Dhule city घटना उघडकीस आल्या आहेत. गुरुवारी पुन्हा एकदा शहरात गँगवार घडले. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी नगांवबारी परिसरात झालेल्या गॅंग वॉर वेळी फायरिंग झाल्याची देखील चर्चा परिसरात सुरू होती. धुळे शहरात पुन्हा एकदा गॅंग वॉरने डोके वर काढल्याने या टोळींचा, त्यांच्या म्होरक्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. टोळी युद्धातून धुळे शहराच्या मध्यवर्ती भागात गजबजलेल्या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी एका टोळीच्या मुख्य म्होरक्याचा खून झाल्याची घटना धुळेकर अजून विसरलेले नाहीत. तर दोन्ही गॅंग मधील दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर या घटनेतील फरार आरोपींचा शोध पश्चिम देवपूर पोलीस घेत आहेत.

हेही वाचा MD Drugs Seized Panvel तीन कोटींचे एमडी ड्रग्ज मानखुर्दमधून जप्त, दोन आफ्रिकन लोकांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.