प्रवीण दरेकर यांच्या 'त्या' वक्तव्यावर धुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

author img

By

Published : Sep 14, 2021, 8:58 PM IST

प्रवीण दरेकर यांच्या 'त्या' वक्तव्यावर धुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

प्रवीण दरेकर यांनी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रदेशावर केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादीच्या महिला चांगलीच आक्रमक झाली आहे. धुळ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने दरेकर यांच्या पोस्टरला चपला मारून, शेन लावून जोरदार निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. अशी टीका दरेकर यांनी केली होती.

धुळे - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रदेशावर केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादीच्या महिला चांगलीच आक्रमक झाली आहे. धुळ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने दरेकर यांच्या पोस्टरला चपला मारून, शेन लावून जोरदार निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. असे म्हणत भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या प्रवेशावर नाव न घेता टीका केली होती.

प्रवीण दरेकर यांच्या 'त्या' वक्तव्यावर धुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

'दरेकर यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस फिरू देणार नाही'

प्रवीण दरेकर यांच्या बोलण्यामुळे तुमची आणि तुमच्या भाजप पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली आहे. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचे वक्तव्य केले त्यामुळे तुम्ही महिलांची माफी मागावी. अन्यथा, राष्ट्रवादी महिला पक्ष गाल आणि थोबाड रंगवून दाखवेल. तसेच, महाराष्ट्रात दरेकर यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस फिरू देणार नाही असा इशारा जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा यांनी दिला आहे. या आंदोलनात ज्योती पावरा, सरोज कदम, हिमानी वाघ, मालती पदवी, संजीवनी पाटील, नीता गरुड, तरुणा पाटील, माधुरी पाटील, रेखा सूर्यवंशी, सरोज पवार, शारदा भामरे, आदी सहभागी होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.