Kanubai Mata Utsav : खान्देशची ग्रामदेवता! कानुमातेचा उत्सवाला सुरवात

author img

By

Published : Aug 7, 2022, 5:34 PM IST

Kanubai Mata Utsav

श्रावण विविध सण, उत्सवांचा महिना खान्देशात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. श्रावणात येणाऱ्या नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी घरोघरी कानुबाई मातेची स्थापना ( Establishing Kanubai statue )होते. खान्देशात कोणी कानुमाता म्हणते, तर कोणी कानबाई म्हणते. कानुमातेच्या रोटला विशेष महत्व असते. चाकरमाने कानुबाई मातेच्या उत्सवानिमित्त ( Kanubai Utsav Celebration ) आपल्या गावी येतात. भाऊबंदकीला या उत्सवात विशेष महत्व असते. कोरोनाच्या ( Corona ) प्रादुर्भावामुळे, निर्बंधामुळे गेली दोन वर्ष आपल्या कानुमातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नव्हता. मात्र यंदा कानुमतेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय.

धुळे - श्रावण विविध सण, उत्सवांचा महिना खान्देशात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. श्रावणात येणाऱ्या नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी घरोघरी कानुबाई मातेची स्थापना ( Establishing Kanubai statue )होते. खान्देशात कोणी कानुमाता म्हणते, तर कोणी कानबाई म्हणते. कानुमातेच्या रोटला विशेष महत्व असते. चाकरमाने कानुबाई मातेच्या उत्सवानिमित्त ( Kanubai Utsav Celebration ) आपल्या गावी येतात. भाऊबंदकीला या उत्सवात विशेष महत्व असते. कोरोनाच्या ( Corona ) प्रादुर्भावामुळे, निर्बंधामुळे गेली दोन वर्ष आपल्या कानुमातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नव्हता. मात्र यंदा कानुमतेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

कानुबाई मातेचा उत्सव

कानुमातेची स्थापना-विसर्जन - श्रावणात येणाऱ्या नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी घरोघरी कानुबाई मातेची स्थापना होते. रविवारी सायंकाळी उशीरा स्थापना झाल्यानंतर देवीची विधिवत पूजा - आरती होते. त्यानंतर रात्रभर देवीसमोर पूजा-पाठ होत असते. रात्रभर देवीसमोर चालणाऱ्या पूजा-पाठ बरोबरच कोणी भाविक डुबली वाद्यावर देवीचे गाणे म्हणत असतात. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना फुटाणे, लाह्यांचा प्रसाद दिला जातो. तर देवीला पुरण पोळी, खीर, भात, आमटी तसेच भाज्यांचा नैवेद्य दाखवण्यात येतो ( Prasad Offering from devotee ). दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी कानुमातेला दही, भाताचा नैवेद्य दाखवून, आरती झाल्यानंतर दुपारी उशिरा पर्यंत कोणी नदीवर, तर कोणी घरीच कानुमातेचं वाजत गाजत विसर्जन करतात.

रास पूजन - कानु मातेच्या स्थापनेच्या एक दिवस अगोदर म्हणजे शनिवारी सकाळी घरातील पुरुष - महिला रोट साठी असलेले गहू देवीसमोर , देवासमोर ठेवून त्याची विधिवत पूजा करून तदनंतर दळून आणतात. हे दळून आलेलं पीठ साधारण आठ ते पंधरा दिवसाच्या आत घरातील सदस्य संख्येनुसार पूर्ण करण्यात येतं.

कानुमातेच्या रोटाचे महत्व - कानुमातेचं रोट म्हणजे जे पीठ पूजा करून दळून आणलेलं असतं ते पीठ साधारण पंधरा दिवसात म्हणजे पौर्णिमेपर्यंत संपवायचं असतं.काही वेळा पौर्णिमा काही दिवसांवर असते म्हणजे अवघ्या चार -पाच दिवसावर असल्यास घरातील वडीलधाऱ्यांच्या सल्ल्यानुसार रोट पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात येतं.

कानुमातेच्या उत्सवामुळे भाऊबंदकी एकत्र - सध्याच्या विभक्त कुटूंब पद्धतीत देखील कानुमातेलाभाऊबंदकी एकत्र येण्याची परंपरा कायम आहे. कानुमातेचा उत्सव म्हणजे घरातील एकोपा दर्शवणारा उत्सव. कानुमातेच्या उत्सवानिमित्त, कानुमातेच्या रोट खानाच्या निमित्ताने का होईना घरातील सर्व सदस्य एकत्र असतात.भाऊबंदकीतील सदस्य एकत्र येतात. गेली दोन वर्ष कोरोनाचे निर्बंध, कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे सण , उत्सवांवर देखील निर्बंध आले होते. मात्र यंदा हे निर्बंध नसल्यानं कानुमातेच्या उत्सवासाठी भाविकांचा उत्साह दिसून येत आहे.

हेही वाचा - JEE Result: जेईईचा आज निकाल लागणार; 'या' साईटवर पाहता येणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.