मदत देणारे मुख्यमंत्री, अजूनपर्यंत पूरग्रस्तांना मदत का मिळाली नाही; आशिष शेलार यांचा सवाल

author img

By

Published : Aug 4, 2021, 4:40 PM IST

Updated : Aug 4, 2021, 6:54 PM IST

Ashish Shelar

भाजपचे आमदार आशिष शेलार हे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली, यावेळी आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतला.

धुळे - भाजप नेते आशिष शेलार यांनी पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. शेलार हे धुळे दौऱ्यावर आले होते. पूरग्रस्त भागाची व्याप्ती व सर्व पंचनामे न करताच हे पॅकेज जाहीर केले असल्याचे शेलार म्हणाले.

भाजप नेते आशिष शेलार

हेही वाचा - राष्ट्रवादी-भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही; शरद पवार-अमित शाह भेटीनंतर अंजली दमानियांचं ट्विट

पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी शब्द का फिरवला? तुम्ही स्वतः म्हणाले होतात मी पॅकेज देणारा मुख्यमंत्री नाही, मी मदत देणारा मुख्यमंत्री आहे. मग जी तातडीची मदत या पूरग्रस्त भागातील लोकांना मिळायची होती ती अजून संपूर्ण मदत का मिळाली नाही? ती मदत का पोहोचवली नाही याचे उत्तर देणे अपेक्षित आहे. राज्य सरकारचे पॅकेज संपूर्ण अभ्यास अंतर्गत आहे, असं आम्हाला वाटत नाही. ही मदत तोकडी आहे, याचं कारण संपूर्ण पंचनामे अजून झालेच नाहीत. संपूर्ण पंचनामे न करता आणि संपूर्ण व्याप्ती जाणून न घेता घोषित केलेले हे पॅकेज आहे, असे शेलार यांनी सांगितले.

भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे ट्विट अंजली दमानिया यांनी केले होते. कोण कोणाला भेटतो हा त्यांचा व्यक्तींक प्रश्न आहे. केंद्रात बसलेले मंत्री हे सर्वच नेत्यांना भेटतात हे मला माहिती आहे. मी वास्तववादी कार्यकर्ता असल्यामुळे आज मी एवढंच सांगेन, भाजप सक्षम विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करेल, अंजली दमानिया यांच्या ट्विटरवर मी कोणतेही भाष्य करणार नाही, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.

मलंगगडमध्ये एका तरुणाने एका तरुणीला तोकडे कपडे का घातले असा जाब विचारत त्या तरुणीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. हा घृणास्पद प्रकार आहे. राज्याच्या माता-भगिनी सुरक्षित नसतील आणि सुरक्षितता ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यांचे मानसिक खच्चीकरण या राज्य सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांमुळे होत असेल तर मला असं वाटते. राज्याच्या माता भगिनींच्या सुरक्षिततेची जबाबदारी आता कोण घेणार? असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रातल्या माता-भगिनींची सुरक्षा करणे राज्य सरकारचे काम -

नांदेड येथील एका होस्टेलच्या उद्घाटनाबाबत नवाब मलिक यांनी राज्यपालांवर केलेल्या टीकेबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले, नवाब मलिक हे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत हे त्यांनी विसरू नये. राज्यपाल हे राष्ट्रपती नियुक्त असून, त्यांच्यावर टीका करण्याचा नवाब मलिक यांना कोणताही कायदेशीर अधिकार नाही, त्यांना उद्घाटनाचे निमंत्रण आले असेल तर ते उद्घाटन करतील, नवाब मलिक यांना त्यांच्या पक्षातील कोणी बोलावत नसेल तर त्यांनी त्यांची कोल्हेकुई राज्यपालांवर न करता स्वतःचा अभ्यास करावा, अशी टीका शेलार यांनी केली.

हेही वाचा - Tokyo Olympics : कुस्तीपटू रवी दहियाने रचला इतिहास, रौप्य निश्चित; आता 'सुवर्ण'साठी भिडणार

Last Updated :Aug 4, 2021, 6:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.