चार वेळा पुराखाली गेली शेती; कर्ज कसं चुकवायचं म्हणत तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास

author img

By

Published : Jul 27, 2022, 10:50 PM IST

Chandrapur Farmer Suicide News

चंद्रपूर जिल्ह्यातील चुनाळा गावातील एक तरुण शेतकऱ्याची चार वेळा शेती पुराखाली गेली. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर हा वाढतच गेला. हे डोक्यावर असलेले कर्ज आता कसे फेडायचे या विवंचनेत शेतकऱ्यानी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ( Young Farmer Commits Suicide in Chunala )

चंद्रपूर - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस ( Heavy Rain In Chandrapur ) होता. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील चुनाळा गावातील एक तरुण शेतकऱ्याची चार वेळा शेती पुराखाली गेली. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर हा वाढतच गेला. हे डोक्यावर असलेले कर्ज आता कसे फेडायचे या विवंचनेत शेतकऱ्यानी गळफास घेऊन आत्महत्या केली ( Young Farmer Commits Suicide in Chunala ) आहे. रविंद्र नारायण मोंढे (वय ४५) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

कर्जाच्या विवंचनेतून केली आत्महत्या - राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील निवासी रविंद्र यांच्याकडे सात एकर जमीन आहे. त्यांनी सेवा सहकारी संस्था मर्यादित चुनाळा येथून शेतीकरीता सत्तर हजार रुपयांचे पीक कर्ज उचल करून शेतात कपाशी व सोयाबीन पिकांची पेरणी केली होती. रविंद्र हा एकुलता एक मुलगा असल्याने घरच्या माताऱ्या आई वडिलांचा सांभाळ वर्षभर शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या भरवशावर करीत होता. मात्र या एक महिन्यात चार वेळा पुराच्या पाण्याखाली शेतपिक आल्यामूळे संपूर्ण पीक उध्वस्त झाले. त्यापूर्वीही दुबार पेरणीच्या संकटाला समोर जावे लागले. अशातच रवींद्र यांच्या आईला इलेक्ट्रिक शॉक लागल्याने त्याही दवाखान्यात उपचार घेत होत्या. घरची परिस्थिती हलाकीची असल्याने बँकेचे कर्ज आणि इतरांकडून हात उसने घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत रविंद्र होता. याच विवंचनेतून रविंद्रने आपल्या राहते घरी कोणीच नसल्याचे पाहून गळफास घेत आत्महत्या केली. जवळच्या नागरिकांच्या लक्षात आले असता राजुरा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाचा पंचनामा केला. व मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता राजुरा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

हेही वाचा - The Bullion Exchange : इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजचा मुंबई शेयर मार्केटवर परिमाण होणार नाही; तज्ञांचे मत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.