शहरातील मध्यभागी आढळले नवजात अर्भक; फुटपाथवर दिले होते बेवारस सोडून

author img

By

Published : Aug 18, 2021, 6:56 AM IST

Updated : Aug 18, 2021, 7:45 AM IST

Newborn baby found in chandrapur, someone leave her on footpath

शहरातील बसस्थानक परिसरात जिल्हा न्यायालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय आहे. यामुळे हा परिसर वर्दळीचा आहे. याच मार्गावरून सकाळी फिरत असताना काही लोकांना लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला.

चंद्रपूर - शहरातील मध्यभागी एक नवजात अर्भक आढळल्याने खळबळ उडाली. शहरातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर नवजात बालिका आढळली. ही घटना काल (मंगळवारी) सकाळच्या सुमारास समोर आली. दरम्यान, नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे.

स्थानिक महिला याबाबत माहिती देताना

बाळाचा रडण्याचा आवाज -

शहरातील बसस्थानक परिसरात जिल्हा न्यायालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय आहे. यामुळे हा परिसर वर्दळीचा आहे. याच मार्गावरून सकाळी फिरत असताना काही लोकांना लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. तपास केला असता फुटपाथवरील महिला बचतगटाच्या झुणका भाकर केंद्राच्या ठिकाणी एक नवजात बालिका असल्याचे समोर आले. याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली.

या नवजात बालिकेला शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. इथे तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती स्वस्थ असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, यानंतर या बालिकेला या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या ताब्यात देण्यात आले आहे. जवळच बसस्थानक असल्याने रात्रीच्या सुमारास कोणी या नवजात बालिकेला येथे सोडून देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रामनगर पोलीस याबाबत तपास करत आहेत.

हेही वाचा - यवतमाळ : अंजी नाईक येथे जेवणातून 45 जणांना विषबाधा

Last Updated :Aug 18, 2021, 7:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.