Ganeshotsav 2022 विदर्भातील वरदविनायक मंदिराचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व, जाणून घ्या

author img

By

Published : Sep 3, 2022, 4:25 PM IST

वरदविनायक मंदिर

विदर्भातील अष्टविनायक Ashtavinayaka of Vidarbha समजल्या जाणाऱ्या गौराळा येथील गणेश मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व Ganeshotsav 2022 आहे. भद्रावती तालुक्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गौराळा या गावाला या मंदिरामुळे वलय प्राप्त झाले आहे. जाणून घेऊया या मंदिराचे ऐतिहासिक आणि पौराणिक know the historical importance of ganpati Temple महत्व.

चंद्रपूर - विदर्भातील अष्टविनायक Ashtavinayaka of Vidarbha समजल्या जाणाऱ्या गौराळा येथील गणेश मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व Ganeshotsav 2022 आहे. भद्रावती तालुक्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गौराळा या गावाला या मंदिरामुळे वलय प्राप्त झाले आहे. जाणून घेऊया या मंदिराचे ऐतिहासिक आणि पौराणिक know the historical importance of ganpati Temple महत्व.

अशोकसिंग ठाकूर, इतिहास संशोधक

असे पडले गौराळा गावाचे नाव - भद्रावतीच्या दक्षिणेस दोन मैलावर गवराळा गाव आहे. याच गावाच्या हद्दीत सद्या वरदविनायकाचे मंदिर, यौवनाश्वाचा महाल तसेच आसना नावाचा प्राचीन तलाव आहे. टेकडीवर वरदविनायकाच्या मागे दोन शिवमंदिरे होती पण ती काळाच्या ओघात नष्ट झाली. या भागात पूर्वी पुष्पक वन होते. प्राचीन काळी गवराळा किंवा गौराळा या गावाचा पत्ता नव्हता. गुरांच्या चराईकरिता व विशेषतः गायच्या चराईकरिता हा भाग राखून ठेवण्यात आला असावा असे गौराळा या नावावरून स्पष्टच होते. कल्याणीचा उत्तर चालुक्य सम्राट सहावा विक्रमादित्य त्रिभुवनमल्ल इ.स. १०७६ ते ११२६ याच्या अमलाखाली हा प्रदेश होता. या प्रदेशाचा कारभार त्याचा महासामन्त श्री धाडीभंडक राणक हा पाहात असे. त्याचा तर्फे त्याचा वासुदेव दंडनायक नावाचा अधिकारी येथे राहात असे. हा येथे लातूर येथून आला होता. या वासुदेव दंडनायकाने शके १००८ वैशाख शुद्ध तृतीया गुरुवारी म्हणजे दिनांक आठ जुलै १०८७ इ.स. रोजी सोन्याची नाणी देऊन १२ निवर्तने जमीन खरेदी केली व त्यापैकी ७ निवर्तने जमीन कोणास तरी गाईच्या चराईकरिता व ५ निवर्तने जमीन गुराख्याच्या निर्वाहाकरिता दान दिली व तो लेख गवराळा येथील एका शेतात सर्वांना दिसेल असा बसविला. हा लेख २/१ या आकाराचा असून तो संस्कृतमिश्रीत अशुद्ध मराठीत आहे. तो सध्या नागपूर येथील मध्यवर्तीसंग्रहालयात आहे. लेखाच्या ११ ओळी असून शेवटच्या ओळीत या दानाचा व भूमीचा जो कोणी लोप करील त्याच्यावर देवतांचा कोप होईल व जो गाईचे अपहरण करीत तो कुंभीपाक नरकात जाईल असा शाप दिला आहे.यावरून दिसून येते की, हा भाग पूर्वी गाईगुरे यांच्या चराईकरिता राखून ठेवला होता. गौराळा म्हणजे गाई चारण्याचे माळरान. पुढे कधी तरी येथे जे गाव वसले त्यास ते जुने गवराळा हेच नाव पडले.



विनायक मंदिर - भद्रावतीच्या दक्षिणेस, गवराळा येथील आसना तलावाच्या व गवराळाच्या पश्चिमेस तसेच रेल्वे स्थानकाच्या मागे स्थित एका उंच टेकडीवरील विनायक मंदिर उत्तराभिमूखी आहे. यात १८० सें.मी. उंच मोठी गणेश प्रतिमा स्थापीत असून हे मंदिर एकमेव दालनाचे आहे. भिंतीमधील संभवतः आठ अर्धस्तंभावर हे मंदिर आयाताकार निर्मित आहे. तसेच या मंदिराचे दालन किंवा गाभारा खोल असून त्यात उतरण्यास पाच पायऱ्या आहेत. हे मंदिर बाहेरील बाजूस ७ मी. पूर्व-पश्चिम व ४.५० मी. उत्तर दक्षिण आकारात निर्मीत आहे.

यवनाश्वाचे मंदिर - विनायक मंदिराच्या उत्तरेस काही फुटावर एक प्राचीन मंदिर निर्मित आहे, त्यास यवनाश्वाचे मंदिर किंवा महाल म्हणतात. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की, आत शंकराची पिंड नसून प्रतिमा आहेत. दुसरे वैशिष्ट्य असे की, मंदिर जरी लहान असले तरी त्याच्या समोर १६ खांबावर आधारित असा सभामंडप आहे. यासच स्थानिक लोक यौवनाश्वाचा महाल म्हणतात. सुमारे पंचाहत्तर-ऐंशी वर्षापूर्वी हा सभामंडप कोलमडून पडला. तशा उद्वस्त अवस्थेत तो बरीच वर्षे पडून राहिला. काही वर्षापूर्वी स्थानीय उत्साही लोकांनी मलमा बाहेर काढला व जुन्याच आधारित एक मंडप उभारला व एका ट्रस्टची निर्मिती केली. स्तंभावर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस भितीत एक शिलालेख बसविला आहे. तो घासल्यामुळे अस्पष्ट असल्याने त्याचे वाचन कोणीच केले नाही. या लेखाची संचालकांना किंमत कळत नाही, त्यांनी त्यावर चुना लेपल्यामुळे त्यावर चुन्याची पुटे चढली आहेत. या शिलालेखात संवत ११६० असा उल्लेख आहे. त्यामुळे हे मंदिर इ. स. ११०४ मध्ये चालुक्य राजा सहावा विक्रमादित्य याच्या काळात बांधण्यात आले असल्याची समोर येते.

हेही वाचा - शरद पवार अन् नितीश कुमार यांची भेट होणार; देशभरात रातकीय चर्चांना उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.