वडिलांना व्हिडिओ कॉल करत डोक्यात झाडली गोळी; अहेरीत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

author img

By

Published : Feb 22, 2022, 9:55 AM IST

पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

'बाबा तुमच्या खात्यात एक लाख रुपये टाकले आहे. उद्या चेक करून घ्या, तुम्ही कसे आहात. मी चांगला आहे, थोडे टेन्शन आहे,' असा संवाद व्हिडिओ कॉलवर त्याने केला आणि त्यांच्यासमक्षच गोळी झाडून आत्महत्या केली. प्रमोद शेगोकार असे पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

बुलढाणा - अहेरी येथे पोलीस विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने वडिलांशी फोनवर व्हिडीओ कॉल करीत स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. वडिलांशी बोलताना तो म्हणाला, 'बाबा तुमच्या खात्यात एक लाख रुपये टाकले आहे. उद्या चेक करून घ्या, तुम्ही कसे आहात. मी चांगला आहे, थोडे टेन्शन आहे,' असा संवाद व्हिडिओ कॉलवर त्याने केला आणि त्यांच्यासमक्षच गोळी झाडून आत्महत्या केली. प्रमोद शेगोकार असे पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

मलकापूर शहरातील प्रमोद चांगदेव शेगोकार (वय 35, बक्कल क्रमांक 1201) हे गेल्या आठ वर्षापूर्वी पोलीस दलात दाखल झाले होते. सेवेत रुजू झाल्यापासूनच गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत आहेत. प्रमोद यांनी सहा वर्षांपूर्वी सहकारी कर्मचारी महिलेसोबत विवाह केला. पत्नीसमवेत अहेरी पोलीस स्टेशन अंतर्गत संसार थाटला. त्यांनी मलकापुरातील पंत नगरात आई वडील लहान भावासाठी नवीन घर बांधले. त्यासाठी आई-वडिलांना नियमित पैसे पाठवत होते. मात्र, बरेच दिवसांपासून त्यांना मलकापूर येथे येणे जमत नव्हते, अशी माहिती शेजार्‍यांनी दिली. रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास प्रमोद यांनी घरी व्हिडिओ कॉल केला. आई-वडील त्यांच्याशी बोलत होते. त्यावेळी घरी ते एकटेच असल्याचे त्यां नी आई वडिलांना सांगितले. एक दोन दिवसात गावाकडे नक्की येईल, कसा येईल सांगता येत नाही. असा संवाद बाप लेकात व्हिडिओ कॉल वर सुरू होता. तेवढ्यात अचानक प्रमोद यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली आणि काही मिनिटांचा संवाद संपुष्टात आला. आई-वडिलांसाठी ही घटना अतिशय धक्कादायक ठरली.

प्रमोद यांच्या वडिलांनी घडलेल्या घटनेनंतर हिम्मत न सोडता पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यामुळे शेगोकार परिवाराचा बांध फुटला. ते रडू लागले. आवाज ऐकून शेजाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्याचवेळी प्रभू त्यांच्या वडिलांनी पंतनगर यातील काही सहकाऱ्यांसमवेत अहेरीकडे प्रस्थान केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.