Buldhana Crime News: लग्न वरातीत वाजलेले गाणे पडले महागात; दोन गटात झालेल्या वादात पोलिसांचा लाठीचार्ज, अनेकजण जखमी तर दंगलीचा गुन्हा दाखल
Published: May 18, 2023, 12:33 PM


Buldhana Crime News: लग्न वरातीत वाजलेले गाणे पडले महागात; दोन गटात झालेल्या वादात पोलिसांचा लाठीचार्ज, अनेकजण जखमी तर दंगलीचा गुन्हा दाखल
Published: May 18, 2023, 12:33 PM

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात16 मे च्या सायंकाळी एका लग्न वरातीमध्ये आक्षेपार्ह गाणे वाजवण्यावरून झालेल्या वादानंतर तणाव निर्माण झाला. काही लोकांनी पाकिस्तान जिंदाबादची नारे दिल्याने वातावरण चिघळले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बुलढाणा : लग्न म्हटले की, डिजे आणि गाणे हे प्रामुख्याने हवे असतात. परंतु या डिजेमुळे अनेकदा संकटही ओढवते. असाच एक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात समोर आला आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली शहरातील सैलानी नगर परिसरात रविवारी सायंकाळी लग्नाची वरात निघालेली होती. मात्र या वरातीत आक्षेपार्ह गाणे वाजवण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला होता. यावेळी पोलिसांचे आणि प्रतिष्ठित लोकांच्या मदतीने वाद मिटल्यावर ही रात्रीला काही मुलांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी मात्र वाद चांगलाच पेटल्यावर दोन्ही गटाकडून दगडफेक झाली. पोलिसांना हा जमाव पांगवण्यासाठी तात्काळ पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागला. त्यांनी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला.
दंगलीचे गुन्हे दाखल : या प्रकरणी चिखली पोलीस स्टेशनला दोन्ही गटातील लोकांवर कलम 160 भादवी सह कलम 135,143,147,148,149,324 337,341 आयपीसी महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 प्रमाणे 31 जणांसह इतर 25 जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील पाच आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली आहे. सध्या सैलानी नगर परिसरातील तणाव पूर्व शांतता आहे, तर पोलीस सुरक्षा सुद्धा यावेळी वाढवण्यात आली आहे.
हल्ला करण्याचा प्रयत्न : चिखली शहरातील सैलानी नगरमध्ये लग्नाची वरात जात असताना एका गाण्यावर आक्षेप घेऊन डीजे बंद पाडला. त्या डिजेवर दगडफेक करून माळी समाजावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. नंतर पाकिस्तान जिंदाबादचे नारे देखील देण्यात आले. जर हे सत्य असेल तर भारतामध्ये राहून भारताचे खाऊन तर कोणी पाकिस्तानचे गुण गात असतील, अशा लोकांना आम्ही ठेसल्याशिवाय राहणार नाही, असे यावेळी आमदार संजय गायकवाड म्हणाले.
|
अफवांवर विश्वास ठेवू नये : त्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावलेले आहेत. त्या ठिकाणी कोबीग ऑपरेशन केलेले आहे. पुढचे काही दिवस आपण त्या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत, सध्याच्या घडीला शांतता आहे. या बाबतीमध्ये तात्काळ कारवाई करण्यात येईल. कोणतीही अफवा व्हाट्सअपवर पसरवू नये. गोंधळ घालणाऱ्यांचा शोध सुरू आहे. त्यांच्यावर कडक कारवाई होईल. सलोख्याला व शांतीला बाधा पोहोचणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे काही करू नये असे आवाहन यावेळी पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा :
- Fire Brigade Recruitment : अग्निशमन दल भरतीदरम्यान लाठीचार्ज, महिला उमेदवारांची भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
- Mumbai Crime News: गुंतवणुकीचे आमिष दाखवून लाखो रूपयांची फसवणुक करणाऱ्या बालकलाकारच्या आईला केली पोलिसांनी अटक
- Buldana Crime : सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
