रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत धिगांना घालणे तिन पोलिसांना पडले महागात, गुन्हा दाखल

author img

By

Published : Sep 7, 2021, 7:12 AM IST

buldana

खामगाव-जालना महार्गावर मद्यधुंद अवस्थेत धिगांना घालणे एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व दोन पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय सुखदेव पवार (वय 56 वर्ष), कर्मचारी योगेश गोविंद राठोड (वय 38 वर्षे) आणि रामदास खुशालराव गावडे (वय 45 वर्षे) अशी त्या पोलिसांची नावे आहेत.

बुलडाणा : खामगाव-जालना महार्गावर देऊळगाव महीजवळील सरंबा फाट्याजवळ रस्त्याच्या मधोमध चारचाकी वाहन लावून मद्यधुंद अवस्थेत धिगांना घालणे एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व दोन पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. धिगांना घालणाऱ्या या तिन पोलिसांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धिगांना घालणारे बीबी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय सुखदेव पवार (वय 56 वर्ष), कर्मचारी योगेश गोविंद राठोड (वय 38 वर्षे) आणि रामदास खुशालराव गावडे (वय 45 वर्षे) अशी त्या पोलिसांची नावे आहेत.

आमदार संजय गायकवाड यांनी धरले धारेवर -

ही घटना रविवारी (5 सप्टेंबर) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे काही तास वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. मात्र बुलडाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी या मद्यधुंद अवस्थेत धिगांना घालणाऱ्या पोलिसांना धारेवर धरले. यानंतर विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.

असा आहे प्रकार -

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन यांना औरंगाबाद येथे रुग्णालयात भेटून आमदार संजय गायकवाड रविवारी बुलडाणाकडे संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास परत येत होते. दरम्यान खांमगाव-जालना महामार्गावरील देऊळगाव महीजवळ सरंबा फाट्यानजीक पुढे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. ठप्प झालेल्या वाहतुकीतून मार्ग काढत पुढे जाऊन पाहिले असता, रस्त्याच्या मधोमध पोलीस लिहीलेली पाटी असलेल्या एम.एच २८ ए.एन ३६४१ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनासमोर काही व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत धिगांना घालत नाचत होते. त्यामुळे चिखलीकडून येणारी वाहतूक दूरपर्यंत ठप्प झाली होती. हा प्रकार पाहून आमदार संजय गायकवाड गाडीतून खाली उतरले. मद्यधुंद धिगांना घालणाऱ्या पोलिसांना त्यांनी धारेवर धरले व त्या मद्यधुंद व्यक्तींचा डान्स बंद केला. धारेवर धरणारे व्यक्ती शिवसेनेचे आमदार असल्याचे समजताच धिगांना घालणारे तिन्ही पोलिस वाहनामध्ये बसले आणि त्यांनी तेथून पळ काढला.

देऊळगाव राजा पोलिसांनी स्वतः दाखल केली फिर्याद -

याप्रकरणी माहिती मिळताच देऊळगाव राजा ठाण्यातील पोलीस नाईक माधव नारायण कुटे यांनी स्वतः तक्रार दाखल केली. रस्त्यावर वाहन उभे करून वाहणास येण्या-जाण्यास अडथळा होइल, अशा प्रकारे रस्त्यावर अडथळा निर्माण केला व दारूच्या नशेत रस्त्यावर मोठ-मोठ्याने आरडा-ओरड करून लोकांशी गैरवर्तन करताना मिळून आले. यावरून सोमवारी (6 सप्टेंबर) सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी तिघांविरुद्ध कलम 283 भादवि सहकलम 85 (1) मुंबई दारूबंदी कलम 110 /117 मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - जिल्हा परिषदेअंदर्गत ३ हजार २०७ कर्मचार्‍यांची भरती करणार -डाॅ. भारती पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.