नीट परीक्षा घडल्यानंतर उत्तर पत्रिका 1 तास परीक्षार्थीकडे.. बुलडाण्यातील प्रकार

author img

By

Published : Sep 13, 2021, 10:28 PM IST

Updated : Sep 13, 2021, 10:36 PM IST

Neet answer sheet outside the examination center

बुलडाण्यात ऑफलाइन घेण्यात आलेली नीट परीक्षेची उत्तर पत्रिका परीक्षा संपल्यानंतर तब्बल एक तास परीक्षार्थीकडे बाहेर असल्याचा प्रकार समोर आला आहे. याची माहिती समोर आल्यानंतर संबंधित परीक्षार्थीकडून ही उत्तर पत्रिका पुन्हा जमा करून घेण्यात आली.

बुलडाणा - बुलडाण्यात ऑफलाइन घेण्यात आलेली नीट परीक्षेची उत्तर पत्रिका परीक्षा संपल्यानंतर तब्बल एक तास परीक्षार्थीकडे बाहेर असल्याचा प्रकार समोर आला आहे. याची माहिती समोर आल्यानंतर संबंधित परीक्षार्थीकडून ही उत्तर पत्रिका पुन्हा जमा करून घेण्यात आली. दरम्यान, या परिक्षार्थीने चुकीने जी शाळेत जमा असते त्या उत्तर पत्रिकेची कार्बन कॉपी सोबत नेली होती, असे स्पष्टीकरण केंद्रप्रमुखांनी नंतर दिले.

माहिती देतान केंद्रप्रमुख

हेही वाचा - वाढदिवसाला कपडे भेट देऊन दाजीचा अल्पवयीन मेहुणीवर कारमध्ये बलात्कार, बुलडाण्यातील प्रकार

परीक्षा केंद्राबाहेर गेलेल्या उत्तरपत्रिकेची चौकशी होणे गरजेची

रविवारी 12 सप्टेंबर रोजी देशासह राज्यात विविध परीक्षा केंद्रांवर एकाच दिवशी, एकाच वेळी ऑफलाईन नीटची परीक्षा घेण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात देखील नीटची परीक्षा घेण्यात आली. बुलडाणा शहरात सहकार विद्या मंदिर, श्री शिवाजी विद्यालय आणि जांभरूळ येथील तोमई इंग्लिश शाळेच्या परीक्षा केंद्रावर नीटची परीक्षा घेण्यात आली. जांभरूळ येथील तोमई इंग्लिश शाळेच्या परीक्षा केंद्रावर 1 पासून 12 खोल्यांत 120 परीक्षार्थींनी नीटची परीक्षा दिली. संध्याकाळी 5 वाजता परीक्षा संपल्यावर खोली क्र. 9 मधील एका परीक्षार्थीची उत्तर पत्रिका केंद्राबाहेर गेल्याचे समोर आले. यानंतर याबाबतची माहिती विचारल्यावर तोमई इंग्लिश शाळेच्या परीक्षा केंद्रावरील उपस्थित केंद्रप्रमुख व कर्मचाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण दिले.

ती उत्तर पत्रिका नव्हे तर, उत्तर पत्रिकेची कार्बन कॉपी

परीक्षा सुटल्यावर चांडोलच्या एका परीक्षार्थींने चुकीने जी शाळेत जमा असते, ती उत्तर पत्रिकेची कार्बन कॉपी सोबत नेली होती, ती त्याच्याकडून जमा करण्यात आली आहे. जमा करण्यात आलेली कॉपी नीटची ओरिजनल उत्तर पत्रिका नव्हती, अशी कबुली तोमई इंग्लिश शाळेचे परीक्षा केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक अजय जवंजाळ यांनी दिली.

नियमांची काटेकोरपणे अमलबजावणी बंधनकारक

वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी सुरुवातीला परीक्षार्थींनी नीट परीक्षा देणे बांधनकारक आहे. परीक्षेमध्ये चांगले गुण मिळविणाऱ्या परीक्षार्थींना वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेता येते. विशेष म्हणजे, परीक्षेत मेरिट गुण प्राप्त करणाऱ्यांना सरकारी कोट्यामधून निशुल्क आणि काही शुल्क भरून वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण प्राप्त करता येते. त्यानंतरच संपूर्ण वैद्यकीय शिक्षणानंतर वैद्यकीय अधिकारी पदवी प्राप्त करता येते. नीट परीक्षा केंद्र सरकारकडून घेण्यात येते. ही परीक्षा अत्यंत महत्वाची असून परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर कडक नियमावली देण्यात येते. या नियमांचे काटेकोरपणे अमलबजावणी करणे परीक्षा केंद्र असलेल्या शाळांना बंधनकारक असते.

हेही वाचा - पुर्णा नदीच्या पुलावर पाच फूट पाणी, नांदुरा-जळगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद

Last Updated :Sep 13, 2021, 10:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.